प्रतिबंधित क्षेत्रात २४ तास बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:24 PM2020-05-12T12:24:48+5:302020-05-12T12:25:21+5:30
जळगाव : शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्याला आळा घालण्यासाठी ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या ...
जळगाव : शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्याला आळा घालण्यासाठी ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून तेथे कोणालाही येण्या-जाण्यास परवानगी नाही. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलभ रोहन यांनी सोमवारी सकाळी प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन बंदोबस्तासोबतच रुग्ण संख्या, क्वारंटाईन केलेले रुग्ण व इतर नातेवाईक यांची माहिती घेतली. शहरात १५ ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
शहरातील लक्ष्मी नगर, नेहरू नगर, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी, अक्सा नगर, जोशी पेठ, समता नगर, खंडेराव नगर, गोपाळपुरा, मारोती पेठ, गोधडीवाला सोसायटी आदीसह १५ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या भागात पोलिसांचा २४ तास बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी समता नगरापासून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करायला सुरुवात केली. विनाकारण शहरात फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याच्या सूचना बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. काही ठिकाणी ते स्वत: थांबून कारवाई करीत आहेत.