२४ हजार निराधारांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:15 AM2021-04-16T04:15:21+5:302021-04-16T04:15:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधांची घोषणा करताना पाच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना विशेष साहाय्य ...

24,000 destitute will get help | २४ हजार निराधारांना मिळणार मदत

२४ हजार निराधारांना मिळणार मदत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधांची घोषणा करताना पाच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना विशेष साहाय्य योजनेंतर्गत या काळात प्रत्येकी १ हजाराची मदत दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण २४ हजार ४७२ जणांना ही मदत मिळणार आहे.

राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत नागरिक अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कामासाठी बाहेर निघू शकणार नाहीत. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडत आहेत. अल्प उत्पन्न स्तरातील नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यासाठी सरकारने ही विशेष साहाय्य योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला १ हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण २४ हजार ४७२ लाभार्थ्यांना ही रक्कम मिळणार आहे.

वृद्धापकाळ निवृत्ती योजनेचे सर्वाधिक लाभार्थी

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी हे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे आहेत. त्यात ८९ हजार ४१५ लाभार्थी आहेत. तर इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचे फक्त ५५८ लाभार्थी आहेत.

कोट - लॉकडाऊनच्या काळात मदत म्हणून सरकार १ हजार रुपये देत आहे. त्यात भागेल का आणि हे पैसे कधी येणार, सरकारने पैसे लवकरात लवकर दिले तर त्याचा फायदा होईल. - विमल सोनवणे,

पैसे कधी मिळतील, या पैशांमधून किमान औषधांची तरी सोय होईल. त्याचा आम्हाला फायदा होईल - बुधा सपकाळे

विशेष साहाय्य योजनेतंर्गत लाभार्थी संख्या संजय गांधी निराधार अनुदान योजना ५८२८४

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ७८९०१

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना ८९४१५

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना १३३१४

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना ५५८

एकूण २४०४७२

Web Title: 24,000 destitute will get help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.