जिल्हा परिषद शाळांमधील २४३ वर्गखोल्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:51+5:302021-06-17T04:12:51+5:30
डमी - स्टार - ८१५ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ...
डमी - स्टार - ८१५
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या १८२८ शाळा आहेत. या शाळांमधील २४३ वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या धोकादायक झाल्या आहेत़ ह्या वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी बसण्यायोग्य नाहीत.
शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून वाचन आनंद दिवस, ज्ञान रचनावाद, डिजिटल शाळा, अक्षर सुधार कार्यक्रम असे विविध उपक्रम साजरे करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी शहरातील खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांपेक्षाही स्मार्ट व्हाव्यात यासाठी जळगाव जिल्ह्यात शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविले. परंतु अपुऱ्या निधीमुळे व दुर्लक्षामुळे जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २४३ वर्गखोल्या ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहेत. अनेक शाळा तर वर्षानुवर्षापासून पडक्या स्वरूपात पडून आहेत़ अशा शाळांची तत्काळ दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
-----
पॉइंटर्स
जिल्ह्यातील एकूण शाळा- १८२८
एकूण विद्यार्थी - ६२३९९६
वर्गखोल्यांच्या दुरुस्ती आवश्यकता : २४३
-----
कोणत्या तालुक्यात किती धोकादायक?
अमळनेर - ०८
भडगाव - ०९
भुसावळ - ०६
बोदवड - १२
चाळीसगाव - ३०
चोपडा - २१
धरणगाव - १५
एरंडोल - २०
जळगाव ग्रामीण - १४
जामनेर - २४
मुक्ताईनगर - १८
पाचोरा - ०९
पारोळा - २१
रावेर - १८
यावल - १८
---
२२३ नवीन वर्गखोल्यांना मंजुरी
जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्याकडून धोकादायक वर्गखोल्यांची माहिती मागविली होती, त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या सुमारे २४३ वर्गखोल्या धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. मागील वर्षी नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते. जिल्हा नियोजनच्या बैठकीत जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन २२३ वर्गखोल्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे़ यासाठी आता निविदा प्रक्रिया राबविण्यात येते आहे़ प्रत्येक वर्ग खोलीच्या बांधकामासाठी साडेआठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
----
अशा शाळेत मुले पाठवायची कशी?
सध्या शाळा बंद आहेत़ पण, शाळा सुरू झाल्यानंतर पावसाळ्यात शाळेच्या आवारात असलेल्या धोकादायक वर्गखोल्या पावसाळ्यात कधीही कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे मुलांच्या जीविताला धोका असताना मुलांना शाळेत कसे पाठवावे याबाबत संभव आहे.
- पंढरीनाथ कोळी, पालक
-----
पावसाळ्यात अनेकवेळा जिल्हा परिषद शाळांचे नुकसान होते़ ती कोसळतात तर कधी पत्र उडून जातात. त्यामुळे पावसाळ्यात शाळांमध्ये अनेकदा मुलांना पाठविण्याची भीती वाटते. अशा परिस्थितीत शाळेच्या आवारात मोडकळीस आलेली इमारत असेल तर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.
- संजीव पाटील, पालक