लाेकसंघर्षच्या कोविड सेंटरमधून २४५ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:14 AM2021-04-12T04:14:27+5:302021-04-12T04:14:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या लोकसंघर्ष मोर्चाच्या कोविड केअर सेंटरमधून गेल्या महिनाभरात २४५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या लोकसंघर्ष मोर्चाच्या कोविड केअर सेंटरमधून गेल्या महिनाभरात २४५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या ठिकाणी नि:शुल्क सेवा दिली जात असून पुरेशा सुविधांमुळे हे शक्य झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
१७ मार्चपासून लोकसंघर्ष मोर्चातर्फे हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आल होते. महिनाभरात ३४१ रुग्ण दाखल झाले असून सद्यस्थिीत ९२ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये ५५ पुरुष, ३३ स्त्री रुग्ण व ४ लहान मुलामुलींचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांच्या पुढाकाराने हे कोविड केअर सेंटर सुरू झाले असून समाजातील दात्यांच्या मदतीने येथे दाखल असलेल्या रुग्णांना निःशुल्क आरोग्य सेवा, औषधोपचार, भोजन, नाश्ता, चहा, दूध, अंडी, पोषक आहार व निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रुग्णांच्या व्यवस्थेसाठी सचिन धांडे, भरत कर्डिले, दामोदर भारंबे, कलींदर तडवी आदी परिश्रम घेत आहेत.