‘मोरपंख’ संस्थेतर्फे २४ जानेवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:16 AM2021-01-23T04:16:27+5:302021-01-23T04:16:27+5:30
जळगाव : रावेर तालुक्यातील मस्कावद येथील महाराष्ट्र शासन नोंदणीकृत ‘मोरपंख बहुउद्देशीय संस्थे’तर्फे येत्या २४ जानेवारी, रविवार रोजी ...
जळगाव : रावेर तालुक्यातील मस्कावद येथील महाराष्ट्र शासन नोंदणीकृत ‘मोरपंख बहुउद्देशीय संस्थे’तर्फे येत्या २४ जानेवारी, रविवार रोजी सकाळी १० वाजता एक समाजाभिमुख उपक्रम व कौतुक सोहळा जळगावच्या रायसोनीनगर येथील गट नं. ४६० बी, प्लॉट नं. ३ येथील हॉलमध्ये होईल.
गेल्या ८ महिन्यांपासून कोरोनाकाळातही काही जण समाजसेवा करीत आहेत. अशाच काही प्रेरणादायी, ज्येष्ठ समाजसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संस्थेचे उद्घाटनही याप्रसंगी होईल.
या कौतुक सोहळ्यास माजी महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. प्रमोद महाजन उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात डॉ. प्रमोद महाजन, कृष्णाजी खडसे, पुरुषोत्तम पिंपळे, जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व कलावंत तुषार वाघुळदे, अमोल महाजन (नाशिक), पंकज नाले, मंगला पाटील (भुसावळ), दीपक दाभाडे, सुचित्रा महाजन, निशा अत्तरदे, डॉ. जयंती चौधरी, ज्योती राणे यांचा शाल, सन्मानपत्र आणि मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन ‘मोरपंख’ या नूतन संस्थेच्या अध्यक्षा नयना टोके, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव गणेश टोके आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.