२५ नगरसेवक शिवसेनेच्या गडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:17 AM2021-03-16T04:17:28+5:302021-03-16T04:17:28+5:30
कैलास सोनवणे यांचे बाराही नगरसेवक फुटले : फुटलेल्या नगरसेवकांची अधिकृत यादी ‘लोकमत’च्या हाती लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - ...
कैलास सोनवणे यांचे बाराही नगरसेवक फुटले : फुटलेल्या नगरसेवकांची अधिकृत यादी ‘लोकमत’च्या हाती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपातील सत्ताधारी भाजपमध्ये उभी फूट पडली असून, तब्बल २५ नगरसेवक शिवसेनेच्या गडाला लागले असल्याची माहिती भाजपच्या अधिकृत सूत्रांनी लोकमतला दिली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १ ते ३ मधील कैलास सोनवणे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बाराही नगरसेवक भाजपमधून फुटले आहेत. यामुळे शिवसेनेच्या १५ नगरसेवकांसह भाजपमधून फुटलेले २५ व एमआयएमचे ३ नगरसेवक मिळून शिवसेनेची एकूण संख्या ४३ पर्यंत पोहोचली आहे. यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
रविवारी भाजपचे काही नगरसेवक फुटून मुंबईला रवाना झाले असल्याचे जाहीर झाले होते; मात्र एकूण नगरसेवक किती फुटले, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती मिळू शकली नव्हती. शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून २५ पेक्षा अधिक नगरसेवक फुटल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार सोमवारी फुटलेल्या नगरसेवकांचा अधिकृत आकडा समोर आला आहे. यामध्ये भाजपचे २५ नगरसेवक फुटले आहेत. तर एमआयएमच्या तिन्ही नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिले आहे.
मोठी ऑफर दिल्याची चर्चा
भाजपकडून फुटलेल्या २५ नगरसेवकांना शिवसेनेकडून मोठी ऑफर दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेत्यांकडूनदेखील नगरसेवकांसाठी रसद पुरवली जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्याच सूत्रांनी दिली आहे.
हे नगरसेवक शिवसेनेच्या दारी
प्रभाग क्रमांक १
प्रिया जोहरे
सरिता नेरकर
ॲड. दिलीप पोकळे
खान रूकसान बी गब लु
प्रभाग क्रमांक २
कांचन सोनवणे
नवनाथ दारकुंडे
गायत्री शिंदे
किशोर बाविस्कर
प्रभाग क्रमांक ३
मीना सपकाळे
दत्तू कोळी
रंजना सपकाळे
प्रवीण कोल्हे
प्रभाग क्रमांक ४
चेतन सनकत
प्रभाग क्रमांक ८
प्रतिभा पाटील
प्रभाग क्रमांक ९
प्रतिभा देशमुख
प्रभाग क्रमांक १०
कुलभूषण पाटील
प्रभाग क्रमांक ११
ललित कोल्हे
पार्वताबाई भिल
सिंधूताई कोल्हे
प्रभाग क्रमांक १४
रेखा पाटील
सुरेखा सोनवणे
प्रभाग क्रमांक १६
रेश्मा काळे
मनोज अहुजा
प्रभाग क्रमांक १७
सुनील खडके
मीनाक्षी पाटील