25 कोटींचा ठराव मनपातच पडून
By admin | Published: January 15, 2017 12:37 AM2017-01-15T00:37:25+5:302017-01-15T00:37:25+5:30
महासेभत मंजूर केलेल्या 25 कोटीच्या कामाचा प्रस्ताव हा शासनाकडे न जाता दीड महिन्यापासून मनपाच्या बांधकाम विभागात पडून आहे.
जळगाव : मनपाने महासेभत मंजूर केलेल्या 25 कोटीच्या कामाचा प्रस्ताव हा शासनाकडे न जाता दीड महिन्यापासून मनपाच्या बांधकाम विभागात पडून आहे. त्यातील कामांच्या अंदाजपत्रकातील त्रुटी दुरुस्ती करून कामातील घोळ निस्तरण्याचे काम सुरू आहे.
दोन वर्षापूर्वी जळगाव दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मनपाला हे 25 कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. महापौरांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून हा निधी मिळविल्यानंतर आधीच्या प्रस्तावातून ती 4 कोटीची कामे वगळून अन्य कामे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तातडीने हा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यास आता दीड महिन्यांचा कालावधी लोटला असला तरीही प्रस्ताव जिल्हाधिका:यांकडे सादर झालेला नाही. काही त्रुटी या प्रस्तावांमध्ये आढळल्याने तसेच नगरसेवकांकडूनही सातत्याने बदल सुचविण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अद्यापही मनपाच्या बांधकाम विभागाकडेच पडून आहे.