साडेचार हजार हेक्टरवर अडीच लाख मेट्रीक टन चाऱ्याचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 12:33 AM2019-05-04T00:33:23+5:302019-05-04T00:34:01+5:30

पशुसंवर्धन विभागाच्या उपाययोजना : बारा हजाराहून अधिक शेतकऱ्यांना मदत

2.5 million metric tonne fodder production | साडेचार हजार हेक्टरवर अडीच लाख मेट्रीक टन चाऱ्याचे उत्पादन

साडेचार हजार हेक्टरवर अडीच लाख मेट्रीक टन चाऱ्याचे उत्पादन

Next

जळगाव- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गुरांची चाऱ्यासाठी वणवण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून डिसेंबरच्या सुमारास शेतकऱ्यांना बियाणे वाटप करून ४ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याची लागवड करून यातून २ लाख ७४ हजार ४०९ मेट्रीक टन चारा उत्पादित केला आहे. जिल्हाभरातील १२ हजार ७३४ शेतकऱ्यांना याची मदत झाल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण गरज व उत्पादित चारा यातील तफावत बघता काही प्रमाणात चाऱ्याची चणचण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, जुलैपर्यंतचे नियोजन असले तरी पावसाने दांडी मारल्यास चारा छावण्याची गरज भासण्याची आवश्यकता विभागाने वर्तविली आहे.

दुष्काळाच्या परिस्थितीत चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेले असल्याने त्यातच पाणीटंचाई यामुळे मिळेल त्या भावात गुरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपल्याचे चित्र शनिवारी जळगावात भरलेल्या पशुबाजारात निदर्शनास आले होत़ मात्र, चाऱ्यांची टंचाई उद्भवू नये म्हणून आपण याचे कधीपासूनच नियोजन केलेले असते़ त्यानुसार चाऱ्याची लागवडही करण्यात येते़ शेतकऱ्यांना तो चारा वाटपही करण्यात आला आहे़ डिसेंबर व काही बियाणे जानेवारीत दिल्यानंतर दोन ते तीन महिन्यात त्याचे उत्पादन निघते.

आकडे बोलतात
जिल्ह्यात सध्या ११ लाख ८५ हजार ३८० पशुधन आहे़
प्रतिदिन ४ हजार ७७८ मे़ टन चारा लागतो़
ऑक्टोबर १८ ते जुलै २०१९ पर्यंत १४ लाख ३३ हजार ५११ मे़ टन चारा लागणार आहे
एकूण उत्पादित होणारा चारा १३ लाख ७८ हजार ८८९ आहे.

काही प्रमाणात चाऱ्याची टंचाईची परिथिस्ती या आकडेवारीवरून दिसते मात्र, शेळ्या मेंढ्यांना आपण चारा देत नाही, तरीसुध्दा त्यांना यात गणले जाते, कधी गरज पडल्यास त्यांनाही पुरविला जातो़ त्याप्रमाणे कृषी विभागाने केलेल्या उपायोजना यात ग्राह्य धरलेल्या नाहीत़ त्यामुळे सध्या तरी चाराटंचाईचा विषय बिकट नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ए़ एम़ इंगळे यांनी दिली. चारा लागवडीसाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते़ शेतकऱ्यांना डिसेंबरला बियाणे वाटप करण्यात आले. याची लागवड होऊन एप्रिल महिन्यात अडिच लाखांच्यावर चाऱ्याचे उत्पादन आलेले आहे़ दरम्यान, यंदा गाळपेरा जमिनीत चारा लागवडीसाठी धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांना २१ हजार ८५ किेलो चाºयाचे बियाणे वाटप करण्यात आले होते. त्यातून २७ हजार ६१८ मे़ टन चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित आहे.

पाण्याची परिस्थिती बिकट
जिल्हाभरात पाण्याचे स्त्रोत आटत आहे़ मोठ्या प्रमाणवर गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ अशा स्थितीत जिल्हाभरातील सर्व पशुधनाला २ कोटी ८६ लाख ११ हजार ५१० लिटर पाणी रोज लागते़ अशा स्थितीत गुरांचेही पाण्याअभावी हाल होत असतानाचे चित्र आहे. 

Web Title: 2.5 million metric tonne fodder production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cowगाय