अडीच लाख मेट्रीक टन चाऱ्याचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:21 PM2019-04-30T12:21:52+5:302019-04-30T12:22:24+5:30
बारा हजाराहून अधिक शेतकऱ्यांना मदत
जळगाव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गुरांची चाºयांसाठी वणवण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून डिसेंबरच्या सुमारास शेतकºयांना बियाणे वाटप करून ४ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावर चाºयाची लागवड करून यातून २ लाख ७४ हजार ४०९ मेट्रीक टन चारा उत्पादित केला आहे़ जिल्हाभरातील १२ हजार ७३४ शेतकºयांना याची मदत झाल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले़
एकूण गरज व उत्पादित चारा यातील तफावत बघता काही प्रमाणात चाºयाची चणचण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ पावसाने दांडी मारल्यास चारा छावण्याची गरज भासण्याची आवश्यकता विभागाने वर्तविली आहे़
दुष्काळाच्या परिस्थितीत चाºयाचे भाव गगनाला भिडलेले असल्याने त्यातच पाणीटंचाई यामुळे मिळेल त्या भावात गुरे विकण्याची वेळ शेतकºयांवर येऊन ठेपल्याचे चित्र शनिवारी जळगावात भरलेल्या पशुबाजारात निदर्शनास आले होत़ मात्र, चाºयाची टंचाई उद्भवू नये म्हणून आपण याचे कधीपासूनच नियोजन केलेले असते़ त्यानुसार चाºयाची लागवडही करण्यात येते़ शेतकºयांना तो चारा वाटपही करण्यात आला आहे़ डिसेंबर व काही बियाणे जानेवारीत दिल्यानंतर दोन ते तीन महिन्यात त्याचे उत्पादन निघते़ एकूण उत्पादित होणारा चारा १३ लाख ७८ हजार ८८९ मे.टन आहे. काही प्रमाणात चाºयाची टंचाईची परिस्थिती या आकडेवारीवरून दिसते मात्र, शेळ्या मेंढ्यांना आपण चारा देत नाही, तरीसुध्दा त्यांना यात गणले जाते, कधी गरज पडल्यास त्यांनाही चारा पुरविला जातो़ त्याप्रमाणे कृषी विभागाने केलेल्या उपायोजना यात ग्राह्य धरलेल्या नाहीत़ त्यामुळे सध्या तरी चाराटंचाईचा विषय बिकट नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ए़ एम़ इंगळे यांनी दिली़ चारा लागवडीसाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये शेतकºयांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते़ यंदा गाळपेरा जमिनीत चारा लागवडीसाठी धरणक्षेत्रातील शेतकºयांना २१ हजार ८५ किेलो बियाणे वाटप करण्यात आले होते़ त्यातून २७ हजार ६१८ मे़ टन चाºयाचे उत्पादन अपेक्षित आहे़
पाण्याची परिस्थिती बिकट
जिल्हाभरात पाण्याचे स्त्रोत आटत आहे़ मोठ्या प्रमाणवर गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ अशा स्थितीत जिल्हाभरातील सर्व पशुधनाला २ कोटी ८६ लाख ११ हजार ५१० लिटर पाणी रोज लागते़ अशा स्थितीत गुरांचेही पाण्याअभावी हाल होत असतानाचे चित्र आहे़