विनामास्क फिरणाऱ्या २५ जणांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:15 AM2021-03-07T04:15:36+5:302021-03-07T04:15:36+5:30
उपायुक्तांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सकाळी अकराच्या सुमारास अचानकपणे गोलाणी मार्केट पासून कारवाईला सुरूवात केली. यावेळी व्यावसायिकांसह खरेदीसाठी आलेले ग्राहकही विनामास्क ...
उपायुक्तांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सकाळी अकराच्या सुमारास अचानकपणे गोलाणी मार्केट पासून कारवाईला सुरूवात केली. यावेळी व्यावसायिकांसह खरेदीसाठी आलेले ग्राहकही विनामास्क फिरतांना आढळून आले. यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी काही ग्राहकांना पकडून, त्यांच्याकडून ५०० रूपये दंड वसुल केला. तसेच फुले मार्केट मध्येही अनेक नागरिक विनामास्क फिरतांना आढळून आल्यावर, त्यांच्याकडूनही दंड वसुल करण्यात आला. दिवसभरात विविध ठिकाणी कारवाई करुन, एकूण २५ नागरिकांवर ५०० रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
इन्फो :
दंड नको, मग मास्क वापरा..
उपायुक्तांनी विनामास्क नागरिकांवर कारवाई करतेवेळी अनेक नागरिकांकडून दंड भरण्याला विरोध करण्यात येत होता. काही नागरिक तर नियमांचे उल्लघंन करुनही मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करित होते. यावेळी उपायुक्तांनी संबंधित नागरिकांना दंड नको असेल, तर नियमित मास्क वापरा, बेजाबदार पणाने वागू नका, असे आवाहनही नागरिकांना करतांना दिसून आले.