जळगाव शहरातील गणपती नगरात २५ हजाराची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 10:07 PM2018-02-04T22:07:05+5:302018-02-04T22:08:45+5:30
एका खासगी रुग्णालयात जनसंपर्क अधिकारी असलेल्या जगदीश अशोक अत्तरदे (वय ३३, मुळ रा.नेपानगर, मध्य प्रदेश) यांच्या गणपती नगरातील घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी १४ हजार रुपये रोख व दागिने असा २४ हजार २०० रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी रामानंद नगर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,४ : एका खासगी रुग्णालयात जनसंपर्क अधिकारी असलेल्या जगदीश अशोक अत्तरदे (वय ३३, मुळ रा.नेपानगर, मध्य प्रदेश) यांच्या गणपती नगरातील घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी १४ हजार रुपये रोख व दागिने असा २४ हजार २०० रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी रामानंद नगर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जगदीश अत्तरदे हे गणपती नगरात मामाच्या घरात भाड्याने राहायला आहेत. प्रसुतीमुळे पत्नी रिताली महिनाभरापासून माहेरी गेली होती तर अत्तरदे यांच्या वडीलांचा ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असल्याने चुलत बहिण दीपाली, आजी व स्वत: अत्तरदे हे नेपानगर येथे गेले होते. त्यामुळे तीन दिवस घर बंद होते. अत्तरदे हे शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता घरी आले असता दरवाजाला लावलेले कुलुप तुटलेले होते तर घरातील कपाटही तुटले होते. अन्य सामानाची नासधूस झालेली होती.
कपाटातील रोकड लांबविली
कपाटात ठेवलेले १४ हजार रुपये (पाच हजाराची चिल्लर), पत्नीच्या कानातील ५ ग्रॅमचे दागिने, चांदीची पाच तोळ्याचे पायल व अन्य किरकोळ दागिने असा २४ हजार २०० रुपयांचा ऐवज गायब झाल्याचे लक्षात आले. घरफोडीचा प्रकार असल्याने अत्तरदे यांनी रात्रीच रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली. महिला उपनिरीक्षक प्राची राजूरकर यांच्यासह कर्मचाºयांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर दुसºया दिवशी रविवारी अत्तरदे यांनी तक्रार दिली.