जळगाव येथे आधार लिंकींगच्या बहाण्याने तरुणीला 25 हजाराचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:14 PM2017-12-28T12:14:22+5:302017-12-28T12:18:18+5:30

‘सायबर क्राईम‘कडे तक्रार

25 thousand rupees frod, in jalgaon | जळगाव येथे आधार लिंकींगच्या बहाण्याने तरुणीला 25 हजाराचा गंडा

जळगाव येथे आधार लिंकींगच्या बहाण्याने तरुणीला 25 हजाराचा गंडा

Next
ठळक मुद्देआईने दिला मुलीचा मोबाईल क्रमांकपासवर्ड सांगताच खात्यातून पैसे काढल्याचा संदेश

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28- बँकेतून कर्मचारी बोलतोय, आपले खाते आधार लिंक करावे लागेल, असा मोबाईवरुन संपर्क साधत एटीएमचा पासवर्ड विचारुन भामटय़ाने गोदावरी कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला 25 हजारात गंडविल़े याप्रकरणी तरुणीने सायबर क्राईम विभागात तक्रार केली आह़े
गोदावरी कृषी महविद्यालयात कोमल चव्हाण रा़ अकलूज ही विद्यार्थीनी शिक्षण घेत आह़े  शिक्षणाकामी ती जळगावात वास्तव्यास आह़े बॅँकेच्या व्यवहारासाठी तिने आईचे एटीएम तिच्याजवळ ठेवले होत़े
आईने दिला मुलीचा मोबाईल क्रमांक
कोमलच्या आईचे बेलापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते आह़े भामटय़ाने 21 रोजी कोमलच्या आईला फोन केला़ तुमच्या खात्याला आधार लिंक झालेले नाही. त्यामुळे बॅँक खाते ब्लॉक होवू शकते, असे सांगत एटीएमचा पासवर्ड मिळविण्याचा प्रयत्न केला़ आईने मुलगी कोमल हिचा मोबाईल क्रमांक देऊन तिच्याशी बोला असे सांगितल़े 

कोमलच्या आईकडून मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर 21 रोजी सायंकाळी भामटय़ाने कोमलला फोन केला़ बॅकेचा अधिकारी बोलत असल्याचे भासवित पुन्हा आधार लिंक करायचे सांगत एटीएमकार्डचा पासवर्ड विचारला़ कोमलने त्यावर विश्वास ठेवून पासवर्ड सांगितला़ अन् काही मिनिटातच कोमलला मोबाईलवर खात्यातून 25 हजार रुपये काढल्याचा संदेश मिळाला़
उर्वरीत 27 हजार काढून घेतल्याने वाचले
25 हजार रुपये काढल्याचा संदेश मिळाल्यावर कोमलला फसवूणक झाल्याचे लक्षात आल़े तिने तत्काळ परिसरातील एटीएम मशीन गाठल़े व खात्यावरील उर्वरीत 27 हजाराची रोकड काढून घेतली़ कोमलच्या प्रसंगावधानामुळे 27 हजार रुपये बचावल़े याप्रकरणी कोमल हिने पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर क्राईम शाखेत तक्रार सादर केली.  

Web Title: 25 thousand rupees frod, in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.