सखाराम महाराज संस्थानच्या वारीची 250 वर्षाची परंपरा
By admin | Published: June 9, 2017 12:03 PM2017-06-09T12:03:07+5:302017-06-09T12:03:07+5:30
अमळनेर येथून उद्या प्रस्थान. 22 दिवसात 550 कि.मी.चा होणार पायी प्रवास
Next
ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.9 : महाराष्ट्रात संत परंपरेचा पाया रचणा:या संत सखाराम महाराज संस्थानच्या पायी वारीचे 10 रोजी पंढरपुरकडे प्रस्थान होत आहे. या पायीवारीला जवळपास अडीचशे वर्षाची परंपरा आहे.
वाडी संस्थानचे 11वे गादी पुरूष हभप प्रसाद महाराज पायी वारीचे नेतृत्व करतात. 2 जुलैला दिंडी पंढरपुरात पोहचेल. अमळनेरच्या संत सखाराम महाराजांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून पायी दिंडीची परंपरा सुरू केली, ती आजतागायत सुरू आहे. ऊन, पाऊस अथवा नैसर्गिक विघAे आली तरी दिंडीच्या दिनक्रमात कुठलाही बदल होत नाही. नियोजीत ठिकाणी, ठरलेल्या दिवशी ही दिंडी पोहचत असते.
पायी वारी निघते, त्यादिवशी पहाटे प्रसाद महाराज वाडीतून पैलाडमधील तुळशीबागेत येतात. तेथे नित्यक्रमाची पुजा-अर्जा होते. शहरातील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. भाविकांना आशिर्वाद दिल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास पायी दिंडी पंढरपुरकडे मार्गस्थ होत असते.
दिंडीचा पहिला मुक्काम पारोळा येथे असतो. त्यानंतर आडगाव, भडगाव, नगरदेवळे, नेरी, नागद, बिलखेडे, नागापूर, पिशोर, चिखलठाणा, टाकळीराजेराय, दौलताबाद, महारूळ, पैठण,शेवगाव, पाथर्डी, धामणगाव, आष्टी, अरणगाव, करमाळा, वडशिवणे, करकंब मार्गे दिंडीचा प्रवास होत असतो. 22 दिवसात 550 किलोमीटरचा प्रवास करीत दिंडी नवमीला अर्थात 2 जुलै रोजी पंढरपुरला पोहचेल. अमळनेर येथून निघणा:या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी होत असतात.