जळगाव जिल्ह्यातील 2500 औषध दुकाने उद्या बंद राहणार
By admin | Published: May 29, 2017 10:41 AM2017-05-29T10:41:40+5:302017-05-29T10:41:40+5:30
केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेच्यावतीने 30 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 2500 औषध विक्रेते सहभागी होणार आहे.
Next
>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.29 - ऑल इंडिया ऑर्गनायङोशन केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेच्यावतीने 30 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 2500 औषध विक्रेते सहभागी होणार आहे. दरम्यान, बंद काळात रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
ऑनलाईन औषधी विक्रीचे घातक परिणाम असल्याने त्यावर तब्बल 70 हजार आक्षेप नोंदवूनही केंद्र सरकारच्यावतीने त्यावर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने हा बंद पुकारण्यात आला आहे. 30 मेच्या बंदच्या पाश्र्वभूमीवर सोमवार, 29 रोजी जिल्हा औषध विक्रेता संघटनेची बैठक होणार असून त्यामध्ये बंदविषयी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी दिली.
पुरेशा प्रमाणात औषध साठा उपलब्ध करण्याच्या सूचना
औषध विक्रेत्यांनी औषध दुकाने बंद ठेवल्यास औषध पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व सहकारी, निमसरकारी रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालये व वैद्यकीय व्यावसायिकांनी पुरेसा औषधसाठा ठेवण्याच्या सूचनादेखील प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा
प्रशासनातर्फे बंद काळात आंबेडकर मार्केटमधील पहिल्या मजल्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात स्वतंत्र नियत्रंण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.औषध निरीक्षक म.बा.कवटीकवार, म. नं. अय्या , जे.एम. चिरमेल हे नियंत्रण कक्षात उपस्थितीत राहणार असून गरजूंनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.