व्यापाऱ्याला २५ हजाराचा ऑनलाइन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:33 AM2020-12-12T04:33:28+5:302020-12-12T04:33:28+5:30

जळगाव : विसनजी नगरातील अतुल नारायण बाविस्कर (वय ४७) या व्यापाऱ्याला ‘फोन पे’ कंपनीचा कस्टमर केअर म्हणून ...

25,000 online bribe to the trader | व्यापाऱ्याला २५ हजाराचा ऑनलाइन गंडा

व्यापाऱ्याला २५ हजाराचा ऑनलाइन गंडा

Next

जळगाव : विसनजी नगरातील अतुल नारायण बाविस्कर (वय ४७) या व्यापाऱ्याला ‘फोन पे’ कंपनीचा कस्टमर केअर म्हणून बोलत असल्याचे बतावणी करून खात्यातून परस्पर ऑनलाइन २५ हजार रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल बाविस्कर यांचे गोलाणी मार्केट येथे किरकोळ धान्याचे दुकान आहे. ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता एका मोबाइलवरून बाविस्कर यांना फोन आला. आपण ‘फोन-पे’ कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून अज्ञात व्यक्तीने अतुल बाविस्कर यांच्या खात्यातून ३४ हजार ९९६ रुपये परस्पर काढून घेतले. फोन ठेवल्यानंतर थोड्या वेळाने त्यांच्या मोबाइलवर पैसे काढल्याचा संदेश प्राप्त झाला. तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे करीत आहेत.

रेल्वे स्थानकाजवळ बेशुद्धावस्थेत सापडलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : रेल्वे स्टेशनसमोरील अत्यवस्थ अवस्थेत आढळून आलेल्या राजेश मुखेर खाड (४५) या प्रौढाचा गुरुवारी रात्री ११.३० वाजता गुलाबराव देवकर आयुर्वेद रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ३ वाजेच्या दरम्यान राजेश खाड हे अत्यवस्थ अवस्थेत पडून होते. शहर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

मोहाडी शिवारात परप्रांतीय मजुराची आत्महत्या

जळगाव : तालुक्यातील मोहाडी शिवारात बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या भिकूकुमार सिंग नंदलाल (वय २४, रा. झारखंड ह.मु. जैन नगर मोहाडी शिवार) या परप्रांतीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भिकूकुमार हा गुरुवारी सायंकाळी ७ वाजता खोलीवर गेला. खोलीवर इतर सहकारीदेखील राहत होते; मात्र गुरुवारी सायंकाळी खोलीवर कुणीही नव्हते. भिकूकुमार याने कापडाच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहकारी मजूर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला.

Web Title: 25,000 online bribe to the trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.