चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे शिवारात २५ डिसेंबरला ‘साहित्याची पेरणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:25 PM2018-12-21T17:25:00+5:302018-12-21T17:26:42+5:30

शेती-शिवाराचे प्रश्न जागतिक पटलावर धडका देत असतांना शेती आणि साहित्याची नाळ जुळून बळीराजाची वेदना समाजापर्यंत पोहचविण्यासाठीच ‘शिवार साहित्य’ संमेलन २५ डिसेंबर रोजी गिरणेच्या कुशीत वसलेल्या मेहुणबारे येथे होत असल्याचे सांगतानाच येथील ‘मसाप’चे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप यांनी एक दिवसीय साहित्य संमेलनाची रुपरेषा गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रपरिषदेत मांडली.

On 25th December, 'sowing of material' in Mehunbara Shiva in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे शिवारात २५ डिसेंबरला ‘साहित्याची पेरणी’

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे शिवारात २५ डिसेंबरला ‘साहित्याची पेरणी’

Next
ठळक मुद्देमंगळवारी जिल्हास्तरीय साहित्य संमेलनपरिसंवाद, एकांकिका, आहिराणी सादरीकरण, कवी संमेलनमहाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई आणि महाराष्टÑ साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने होणार संमेलन

चाळीसगाव, जि.जळगाव : शेती-शिवाराचे प्रश्न जागतिक पटलावर धडका देत असतांना शेती आणि साहित्याची नाळ जुळून बळीराजाची वेदना समाजापर्यंत पोहचविण्यासाठीच ‘शिवार साहित्य’ संमेलन २५ डिसेंबर रोजी गिरणेच्या कुशीत वसलेल्या मेहुणबारे येथे होत असल्याचे सांगतानाच येथील ‘मसाप’चे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप यांनी एक दिवसीय साहित्य संमेलनाची रुपरेषा गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रपरिषदेत मांडली.
मंगळवारी, २५ रोजी महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई आणि महाराष्टÑ साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवी दु.आ.तिवारी साहित्य सभामंडपात संमेलनाचे उद्घाटन कवी व गीतकार प्रकाश होळकर यांच्या हस्ते होईल. संमेलनाध्यक्ष असतील कवी उत्तम कोळगावकर. या वेळी खासदार ए.टी.पाटील, आमदार उन्मेष पाटील, पं.स.सभापती स्मितल बोरसे, जि.प.सदस्या मोहिनी गायकवाड, मेहुणबारेच्या सरपंच संघमित्रा चव्हाण, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य व कवी अशोक कोतवाल, प्रा.डॉ. प्र.ज.जोशी, प्राचार्य तानसेन जगताप आदी प्रमुख अतिथी तर स्वागताध्यक्ष राजेंद्र अमृतकार असतील.
सकाळी ११ वाजता निर्मल सीडसचे संचालक डॉ. जे.सी.राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ‘शेती - शेतकरी - दुष्काळ व साहित्य’ यावर परिसंवाद होईल. प्राचार्य डॉ. सुदाम पाटील, विश्वासराव पाटील, अनिल भोकरे सहभागी होतील.
दुपारच्या सत्रात चार वाजता बहुभाषिक कवी संमेलन होईल. कवी रमेश पवार (अमळनेर) हे अध्यक्षस्थानी, तर कवी डॉ.संजीवकुमार सोनवणे (धरणगाव) हे प्रमुख अतिथी असणार आहेत. कवी संमेलनात माया धुप्पड, विलास मोरे, किशोर काळे, डॉ. अस्मिता गुरव, रमेश धनगर, कृपेश महाजन, अशोक कुमावत, गो.शि.म्हस्कर, गौतमकुमार निकम आदी कवी सहभागी होतील. सूत्रसंचालन मनोहर आंधळे असतील.
सायंकाळी पाच वाजता संमेलनाचा समारोप माजी आमदार आर.ओ.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या वेळी माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख, भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्लीचे सदस्य कैलास सूर्यवंशी आदी प्रमुख अतिथी असतील.
उपस्थितीचे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष विजय पाटील, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुनील राजपूत, सदस्य डॉ. विनोद कोतकर, गणेश आढाव, अशोक ब्राह्मणकार यांनी केले आहे.
‘नली’चे सादरीकरण
दुपारी साडेबारा वाजता श्रीकांत देशमुख लिखित व परिवर्तन जळगाव निर्मित ‘नली’ एकांकिकेचे सादरीकरण युवा नाट्य कलावंत हर्षल पाटील करतील.
दुपारी तीन वाजता अहिराणी बोलीभाषेतील सादरीकरण होईल. यात डॉ.एस.के.पाटील (दाभाडी), डॉ. प्रवीण शांताराम माळी (शिरपूर) हे सहभागी असतील. अध्यक्षस्थान शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन भूषवतील.
शिवाराचे पूजनाने सुरुवात
शिवार साहित्य संमेलनाची सुरुवात ‘शिवार पूजनाने’ होईल. पंचक्रोशीतील शेतकरी, साहित्यिक हे शेती-मातीच्या संस्कृतीचे दर्शन घडविणार आहे. यानिमित्ताने शेताच्या बांधावर साहित्याचा हुंकार उमटणार आहे.

Web Title: On 25th December, 'sowing of material' in Mehunbara Shiva in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.