भाजपचे २७ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला! सांगली पॅटर्न; जळगावची महापौर निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 07:24 AM2021-03-15T07:24:00+5:302021-03-15T07:24:43+5:30

भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन हेच अडचणीत आल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून व्हीप बजावण्याआधीच हे नगरसेवक फरार झाले आहेत.

27 BJP corporators on the way of Shiv Sena! Election of Mayor of Jalgaon | भाजपचे २७ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला! सांगली पॅटर्न; जळगावची महापौर निवड

भाजपचे २७ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला! सांगली पॅटर्न; जळगावची महापौर निवड

googlenewsNext

 

जळगाव : महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीला चार दिवस शिल्लक असतानाच महापालिकेत राजकीय भूकंप झाला असून, जळगावातही सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी भाजपचे ५७ पैकी तब्बल २७ हून अधिक नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले असून रविवारी सायंकाळीच सहलीला रवानाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत भाजपच्या सूत्रांनी देखील दुजोरा दिला आहे. (27 BJP corporators on the way of Shiv Sena! Election of Mayor of Jalgaon)


भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन हेच अडचणीत आल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून व्हीप बजावण्याआधीच हे नगरसेवक फरार झाले आहेत. शिवसेनेकडून सर्व नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला असून, महापौरपदासाठी सेनेच्या जयश्री महाजन यांचे नावदेखील निश्चित केले आहे. जळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. महापौर व उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ मार्चला संपणार आहे. १८ मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रविवारी महाजन कार्यालयात नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्यांनाच उशीर होत असल्याने स्थळ बदलून विमानतळावरच ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेतील बलाबल
भाजप - ५७
शिवसेना - १५
एमआयएम - ३
 

Web Title: 27 BJP corporators on the way of Shiv Sena! Election of Mayor of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.