चाळीसगाव तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत २७ शाळांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 04:43 PM2019-01-04T16:43:19+5:302019-01-04T16:44:40+5:30
जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘लेक वाचवा लेक शिकवा अभियान’ अंतर्गत हरी महारू खलाणे यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात तालुक्यातील २७ शाळांनी सहभाग घेतला.
चाळीसगाव : जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘लेक वाचवा लेक शिकवा अभियान’ अंतर्गत हरी महारू खलाणे यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात तालुक्यातील २७ शाळांनी सहभाग घेतला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक खलाणे होते. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपटराव भोळे यांनी उद्घाटन केले. प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.विनोद कोतकर, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, नगरसेविका शोभाबाई पवार, संस्थेच्या अध्यक्षा लताबाई खलाणे, उपाध्यक्ष जगन्नाथ खलाणे, वाघडूचे मुख्याध्यापक भालेराव, प्राचार्य अभिजित खलाणे उपस्थित होते. परीक्षक म्हणून पृथ्वीराज चव्हाण, एस.डी.संन्याशी यांनी काम पाहिले.
प्रास्ताविक सोनाली महाजन यांनी केले. अशोक खलाणे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थी हा वक्तृत्वातून आत्मविश्वास निर्माण करतो. तसेच नेत्तृत्व गुणही विकसित करतो, असे सांगितले.
२७ शाळांनी घेतला सहभाग
या कार्यक्रमातून एकूण २७ शाळांनी सहभाग नोंदविला. लहान गटात प्रथम क्रमांक ए.बी. हायस्कूलची विद्यार्थिनी मयुरी संदीप अगोने हिने, तर द्वितीय क्रमांक सम्राट अशोक प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी जानवी मनोहर रॉय, तृतीय क्रमांक सामंत माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी इंद्रायणी उदयराव भोसले तसेच मोठ्या गटात प्रथम क्रमांक जयहिंद माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वर्षा सुदाम पवार, द्वितीय क्रमांक ए.बी.मुलांची हायस्कूल विद्यालयाचा विद्यार्थी मंथन कांतीलाल कुमावत, तृतीय क्रमांक पूर्णपात्रे विद्यालयाचा विद्यार्थी यश रुपेश पगार याने पारितोषिक मिळविले.
सूत्रसंचालन चव्हाण यांनी केले, तर आभार एस.एस.महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विभागप्रमुख सुजितकुमार सोनावणे व शिक्षकांनी सहकार्य केले.