धक्कादायक! विवस्त्र करुन विद्यार्थ्यांचं रॅगिंग; एका विद्यार्थ्याच्या धाडसानं फोडली घटनेला वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 07:41 PM2019-10-13T19:41:37+5:302019-10-13T19:44:04+5:30

इकरा युनानी महाविद्यालयातील प्रकार

28 students face ragging in iqra unani college in jalgaon 3 students suspended | धक्कादायक! विवस्त्र करुन विद्यार्थ्यांचं रॅगिंग; एका विद्यार्थ्याच्या धाडसानं फोडली घटनेला वाचा

धक्कादायक! विवस्त्र करुन विद्यार्थ्यांचं रॅगिंग; एका विद्यार्थ्याच्या धाडसानं फोडली घटनेला वाचा

Next

जळगाव : इकरा युनानी महाविद्यालयात शनिवारी मध्यरात्री सिनियर विद्यार्थ्यांकडून २८ विद्यार्थ्यांची रॅगिंग झाली असून यातील काही विद्यार्थ्यांना विवस्त्र करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. मुदस्सर मुख्तार इनामदार (वय १९, रा.परभणी) या विद्यार्थ्याने या प्रकरणाला वाचा फोडली. दिल्ली येथील अँटी रॅगिंग समितीकडे या घटनेची तक्रार झाल्यानंतर तीन विद्यार्थ्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुदस्सर हा परभणी येथील राहणारा असून त्याचे वडील होमगार्ड समादेशक म्हणून कार्यरत आहेत. मुदस्सर याला शासकीय कोट्यातून शहरातील पाचोरा रस्त्यावरील इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. प्रवेश घेतल्यानंतर शुक्रवारी मुदस्सर याला पालकांनी वसतीगृहात दाखल केले. यानंतर शनिवारी त्यांच्या बॅचचा पहिलाच दिवस होता. रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या खोल्यांमध्ये गेले होते. यावेळी १५ ते २० सिनीयर्स विद्यार्थ्यांनी मध्यरात्री दोन वाजता नव्याने दाखल झालेल्या २८ विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला.

सिनेमातील पात्र करायला लावले
मुदस्सरने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजता रॅगिंग करणाऱ्यांनी काही विद्यार्थ्यांना विवस्त्र केले. त्यानंतर सिनेमातील पात्र, प्रियकर-प्रेयसी यांच्या प्रमाणे अ‍ॅक्टिंग करण्यास सांगून नंतर एकेका विद्यार्थ्यांची ओळखपरेड घेतली. यावेळी मुदस्सर याला काही विद्यार्थ्यांनी शिवीगाळदेखील केली. त्याने विरोध करताच तीन-चार जणांनी त्याला खाली वाकवून मारहाण केली आणि त्याच्या खिशातील मोबाईल काढून कचरापेटीत फेकला. तसेच, खिशातील १८ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर त्याला फुंकर मारुन ट्युब लाईट विझवण्यास सांगितले. ट्युबलाईट न विझवल्यास ती अंगावर फोडू असे धमकावण्यात आले. या विद्यार्थ्यांचा त्रास असह्य झाल्यानंतर मुदस्सर याने स्वत:ची सुटका करुन घेत थेट हॉलमधून पळ काढला.

सुरक्षा रक्षकाच्या मदतीने साधला वडिलांशी संपर्क
रॅगिंग करणाऱ्यांपासून सुटका केल्यानंतर मुदस्सर याने सुरक्षारक्षकाच्या मदतीने पालकांना फोन करुन माहिती दिली. त्याच्या पालकांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर प्राचार्य डॉ. शोएब शेख महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनेची चौकशी केली. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास मुदस्सरचे पालक महाविद्यालयात दाखल झाले होते. महाविद्यालय प्रशासनाने पालकांसमोर घडलेला प्रकार मान्य करत दोषी असलेल्या तीन विद्यार्थ्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली. दरम्यान, मुदस्सर याचा मोबाईल व रोख रक्कम काही जणांनी लांबवला असून त्याची तक्रार त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे.

राष्ट्रीय अ‍ँटी रॅगिंग समितीकडे तक्रार
मुदस्सर याने पहाटे पावणे चारच्या सुमारास दिल्ली येथील अँटी रॅगिंग समितीकडे मेलद्वारे तक्रार केली. आज सकाळी नऊच्या सुमारास त्यांना तक्रारीची नोंदणी झाल्याचा मेल आला. यादरम्यान प्राचार्यासह पालकांनी तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस ठाणेही गाठले होते. राष्ट्रीय अँन्टी रॅगिंग समितीच्या सुचनेनुसार प्राचार्य डॉ. शेख यांनी विद्यालयाच्या कार्यालयात रात्री सर्व २८ मुलांचे लेखी जबाब नोंदवून घेतले.
 

Web Title: 28 students face ragging in iqra unani college in jalgaon 3 students suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.