गरिबांना अर्थसहाय्यचे २८० प्रस्ताव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:12 AM2021-07-09T04:12:23+5:302021-07-09T04:12:23+5:30
जळगाव : विधवा, परितक्त्या, गोरगरीब व निराधारांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाने श्रावण बाळ, वृध्दापकाळ व संजय गांधी निराधार अशा योजना ...
जळगाव : विधवा, परितक्त्या, गोरगरीब व निराधारांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाने श्रावण बाळ, वृध्दापकाळ व संजय गांधी निराधार अशा योजना सुरु केलेल्या आहेत. या योजनेंतर्गत जळगाव तालुक्यातील २८० गोरगरीबांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष रमेश जगन्नाथ पाटील यांनी ‘लोकमत’ ला दिली.
अध्यक्ष रमेश जगन्नाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पत्रकार भवनात समितीची बैठक झाली.या बैठकीला सचिव तथा तहसीलदार नामदेव पाटील, सदस्य प्रमोद चौधरी, सचिन चौधरी, अविनाश पाटील, चंद्रकांत भोळे, ललीत साठे, मनोज चौधरी, भागवत पाटील, अव्वल कारकून अर्चना पवार, आर.के.तडवी, महसूल सहाय्यक ज्योती चौधरी, शुभांगिनी बिऱ्हाडे आदी उपस्थित होते.