२८८ कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:40 PM2020-04-23T12:40:22+5:302020-04-23T12:41:53+5:30

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुधवर २२ एप्रिलपर्यंत ३५६ कोरोना संशयीत रुग्णांच्या स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी ...

288 corona suspects report negative | २८८ कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

२८८ कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

Next

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुधवर २२ एप्रिलपर्यंत ३५६ कोरोना संशयीत रुग्णांच्या स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २८८ संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी दिली आहे.
२२ रोजी स्क्रिनिंग ओपीडी मध्ये एकूण ९६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २५ रुग्णांना संशयीत म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. तर आजपर्यंत ओपीडीमध्ये स्क्रिन केलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४ हजार ५५८ इतकी आहे.
आतापर्यंत ५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामधील एक रुग्ण बरा होऊन घरी परत गेला असून २ रूग्णांचा मृत्यु झाला आहे. तर दोन रुग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरु आहेत. तसेच २ रुग्णांचे अहवाल रद्द करण्यात आले असून उर्वरित ६१ रुग्णांचे अहवाल अप्राप्त आहेत.

Web Title: 288 corona suspects report negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव