29 पाणी पुरवठा समित्यांवर करणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 09:35 PM2017-12-14T21:35:49+5:302017-12-14T21:46:11+5:30

अपहार: कार्यवाहीसाठी 20 डिसेंबर डेडलाईन

29 Filing of complaints on water supply committees | 29 पाणी पुरवठा समित्यांवर करणार गुन्हे दाखल

29 पाणी पुरवठा समित्यांवर करणार गुन्हे दाखल

googlenewsNext
ठळक मुद्दे 31 गावांना काही दिवसांची मुदत 4 गावांची कामे पूर्ण
गाव- जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागा अंतर्गत भारत निर्माण योजनेत जिल्ह्यातील 29 पाणी पुरवठा योजना समित्यांवर अपहार व अनियमीतता प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 14 रोजी दिले. ग्रामीण पाणी पुरवठा योजना आढावा बैठक जि. प. च्या सानेगुरुजी सभागृहात झाली. या बैठकीत संबंधित पाणी पुरवठा योजना समिती अध्यक्ष, सचिव तसेच तांत्रिक सल्लागार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिवेगावकर यांनी दिले. ही कार्यवाही 20 डिसेंबर्पयत करण्याची ताकीद दिली असून शाखा अभियंता, उपअभियंता व गटविकास अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बैठकीस पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता एस. बी. नरवाडे, अभियंता व चोपडा, जळगाव, भुसावळ, धरणगाव येथील गटविकास अधिकारी उपस्थित होते.यापूर्वी जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांचा आढावा 22 ऑक्टोबर रोजी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला होता. त्यावेळी मुल्यांकण न करणे, प्रत्यक्षात काम न करता पैसे काढणे, समितीने दप्तर सादर न करणे आदी कारणांमुळे एकूण 40 समित्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. सात दिवसाची कार्यवाही करण्याची मुदत दिली होती. परंतु काही दिवस संधी देत 14 डिसेंबर रोजीच्या बैठकीत फेरआढावा घेण्यात आला. त्यावेळी 29 ठिकाणी अपहार व अनियमीतता आदी बाबी कायम असल्याचे दिसून आल्याने गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर इतर कामे अपूर्ण असलेल्या 31 गावांना काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 15 दिवस ते 3 महिने अशी ही मुदत असून 4 गावांची कामे पूर्ण झाली आहेत... या गावांच्या योजनांवर होणार गुन्हे दाखलमुक्ताईनगर तालुका- खर्ची, डोलारखेडा, चिंचोल, उमरे. बोदवड तालुका- बोदवड, सुरवाडे खुर्द. रावेर तालुका- निमडय़ा, गारबर्डी, गारखेडा, अंधारमळी. अमळेनर तालुका- रुंधाटी, कंडारी खुर्द, लोणे. पारोळा तालुका- मेहू. चोपडा तालुका- मालखेडा, जळगाव तालुका- म्हसावद. धरणागाव- साळवा, रेल, सतखेडा, नांदेड, खर्दे, बाभुळगाव, हिंगोणे खुर्द, कंडारी, दोनगाव, एकलग्न, चोरगाव. भुसावळ तालुका- आचेगाव.. या गावांना दिली मुदतबोदवड तालुका- मनुर बुद्रुक, राजूर, करंजी, सुरवाडे बुद्रुक, पाचदेवळी. रावेर तालुका- बक्षीपूर, निंभोरासीम, उदळी खुर्द, पाल. पाचोरा तालुका- खडकदेवळा, चुंचाळे, खाजोळा, सारोळा खुर्द. चाळीसगाव तालुका- उमरखेड, लोंढे, खराडी. अमळनेर तालुका- हेडावे, बिलखेडा, हिंगोणे, खुर्द प्र अमळनेर, तळवाडे. पारोळा तालुका- टेहू, जिराडी. जळगाव तालुका- वसंतवाडी, जामनेर तालुका- पिंपळगाव कमानी, धरणगाव तालुका- निशाने बुद्रुक, निशाने खुर्द, शामखेडा, गारखेडा, झांबोरे खुर्द, हिंगोणे खुर्द.चार गावांमध्ये योजना पूर्णरावेर तालुका- वाघाडी. चोपडा तालुका- धानोरा. धरणगाव तालुका- उखळवाडी. एरंडोल तालुका- टाकरखेडा.

Web Title: 29 Filing of complaints on water supply committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.