शेवया खाल्ल्याने असोदा येथे ३ बालकांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:03 PM2018-09-08T13:03:41+5:302018-09-08T13:04:48+5:30
जि. प. अधिकाऱ्यांना विचारला जाब
जळगाव : जिल्हा परिषदेत बुरशीयक्त शेवयांचे प्रकरण गाजत असताना तालुक्यातील असोदा येथील वॉर्ड क्रमांक २ मधील अंगणवाडीमध्ये ३ बालकांना शेवया खाल्यामुळे विषबाधा होवून उलट्या झाल्याचा गंभीर प्रकार ६ रोजी घडला. याबाबत जि.प. सदस्या पल्लवी देशमुख यांचे पती रवी देशमुख यांनी बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांना जाब विचारला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जि.प.त वादग्रस्त बुरशीयुक्त शेवया प्रकरण खूपच गाजले. मात्र ‘या’ शेवया खाण्यायोग्य असल्याचा आश्चर्यकारक अहवाल आल्याने नाईलाजाने तक्रारदार सदस्यांना गप्प बसावे लागले. परंतु असे असताना आसोद्यातील या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. ६ रोेजी सकाळी या शेवाया खाल्ल्यानंतर या बालकांना काही वेळातच उलट्या झाल्या. रवी देशमुख व संजय बिºहाडे यांनी तातडीने विषबाधा झालेल्या बालकांना खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने पुढील धोका टळला.
गंभीर प्रकार
हा प्रकार गंभीर असल्यामुळे रवी देशमुख यांनी दुसºया दिवशी जि. प. अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली असता महिला व बालविकास अधिकारी रफिक तडवी यांना तेथे बोलावून देशमुख यांनी तंबी देत दोन-तीन दिवसात सुधारणा न झाल्यास आपल्या आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी तडवी यांंनी तातडीने ‘त्या’ शेवाया जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.