जळगावमध्ये युपीआयचा खात्याची माहिती चोरून युवतीची ३ लाखांची ऑनलाईन फसवणूक
By Ajay.patil | Updated: May 14, 2023 16:51 IST2023-05-14T16:51:26+5:302023-05-14T16:51:48+5:30
शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगावमध्ये युपीआयचा खात्याची माहिती चोरून युवतीची ३ लाखांची ऑनलाईन फसवणूक
जळगाव - शहरातील प्रताप नगरातील तरुणीच्या लॅपटॉप व मोबाईलमधून तीच्या युपीआय खात्याची माहिती चोरुन त्याव्दारे ३ लाख १५ हजार रुपये परस्पर काढून ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातीलल प्रताप नगरात अनुजा श्रेयांश रायसोनी (वय २९) ही तरुणी राहते, ही युवती खासगी नोकरी करते, १२ ते १३ मे दरम्यान, अज्ञातांनी अनुजाचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक केले. त्यानंतर अनधिकृतपणे तिच्याकडील लॅपटॉप तसेच मोबाईलचे पासवर्ड चोरून, अज्ञातांनी अनुजाच्या युपीआय चा संपुर्ण डाटा चोरून घेत, ते लॉगीन केले. तसेच अनुजाच्या आयसीआयसीआय बँकेंच्या खात्यातून १ लाख २५ हजार तर एचडीएचफसीच्या खात्यातील १ लाख ९० हजार अशी एकूण ३ लाख १५ हजार रुपयांची रक्कम परस्पर ऑनलाईन पध्दतीने वळवून तिची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अनुजाने शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक अशोक उतेकर हे करीत आहेत.