यावल येथे कृषी कार्यालयात ७० लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:37 PM2020-01-22T22:37:32+5:302020-01-22T22:39:54+5:30

यावल येथे कृषी कार्यालयात ७० लाखांचा अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

3 lakhs kidnapping at Yaval agricultural office | यावल येथे कृषी कार्यालयात ७० लाखांचा अपहार

यावल येथे कृषी कार्यालयात ७० लाखांचा अपहार

Next
ठळक मुद्देसन २००६ ते १३ दरम्यानची घटना तत्कालीन सहायक अधीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

यावल, जि.जळगाव : येथील तालुुका कृषी कार्यालयाच्या विविध योजनांसाठी आलेल्या निधीचा सन २००६ ते २०१३ या सहा वर्षात तत्कालीन सहाय्यक अधीक्षकाने सुमारे ७० लाख रुपयांच्या धनादेशावर तत्कालीन कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षºया घेऊन विना रेखांकीत धनादेश वटवून अपहार केल्याचा गुन्हा तब्बल सात वर्षांनंंतर बुधवारी नोंदविण्यात आला आहे.
सूत्रांनुसार, येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सहाय्यक अधीक्षक पदावर असलेले नामदेव मंगा वाडे ह.मु.जळगाव यांनी त्यांच्या कार्यकाळात २१ एप्रिल २००६ ते ८ डिसेंबर २०१३ दरम्यान हा अपहार केला. कृषी कार्यालयातील विविध योजनांमधील कामे दाखवून येथील जेडीसीसी बॅकेच्या नावे २६ लाख १० हजार ८८३ रुपयांचे दहा धनादेश, तर स्टेट बँकेच्या खात्यावरील १४ लाख २० हजार रुपयाचे पाच धनादेश व मृदसंधारण विभागातील २५ लाख ८६ हजार ८८७ रुपयाचे धनादेश अशा ६९ लाख ३३ हजार ३६० रुपयांच्या धनादेशावर तत्कालीन तालुका कृषी अधिकासरी यांच्या स्वाक्षºया घेऊन विना रेखांकीत धनादेश स्वत: वटवून अपहार केला. अशा आशयाची फिर्याद जळगाव येथील कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्श्वर राजाराम बोºहाडे यांनी बुधवारी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून वाडे यांच्याविरूद्ध भा.दं.वि. कलम ४६७, ४६८, ४७१, ४०९, ४२० प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वटवण्यात आलेल्या धनादेशाच्या रकमेचा कोठेही ताळमेळ जमत नसल्याने या रकमेचा अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. संशयित आरोपीस अद्याप अटक झालेली नाही. पो. नि. अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जितेंद्र खैरनार, हे.कॉ. संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: 3 lakhs kidnapping at Yaval agricultural office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.