3 एकरात खरबूज फळापासून मिळाले तीन लाखांचे उत्पन्न

By admin | Published: May 10, 2017 05:15 PM2017-05-10T17:15:33+5:302017-05-10T17:15:33+5:30

कु:हा हरदो येथील शेतकरी उत्तम निना नायसे यांनी आपल्या वडिलोपाजिर्त शेतीच्या तीन एकरात जानेवारी महिन्यात खरबूज लागवड केली होती.

3 lakhs yielded three lakhs of melon fruit | 3 एकरात खरबूज फळापासून मिळाले तीन लाखांचे उत्पन्न

3 एकरात खरबूज फळापासून मिळाले तीन लाखांचे उत्पन्न

Next

 बोदवड तालुक्यात नदी-नाले आणि धरण नसतानादेखील निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत कु:हा हरदो (ता. बोदवड) येथील शेतकरी उत्तम नायसे हे पारंपरिक शेतीला फाटा देत सलग तीन वर्षापासून खरबूज या उन्हाळी फळाचे उत्पन्न घेत आहेत. यामुळे शेतीची पोतही सुधारली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे अनेक शेतक:यांनी अनुकरण करून शेतीतून उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे.

कु:हा हरदो येथील शेतकरी उत्तम निना नायसे यांनी आपल्या वडिलोपाजिर्त शेतीच्या तीन एकरात जानेवारी महिन्यात खरबूज लागवड केली होती. तीन महिन्यात येणा:या या पिकाला एकरी पेरणीपासून निंदणी, खत असा एकूण 75 हजार रुपयांचा  खर्च आला. 
वेलाच्याजवळ माश्यांच्या प्रादुर्भावापासून फूल व फळांचे रक्षण व्हावे, या हेतूने त्यांनी शक्कल लढवत प्रत्येक वेलजवळ कीट रक्षण करणारी पेटी बसवली, त्यामुळे फळ धारणा चांगली झाली. एकेका ठिकाणी पाच-पाच फळे जवळपास एक ते सव्वा किलोर्पयतचे खरबुजाचे फळ लागले असून त्यात एक ट्रॅक्टर भरून खरबूज व्यापा:याने शेतातूनच भरून नेले. साधारणत: यातून तीन एकरात तीन लाखांचे उत्पन्न कमी कालावधीत व कमी पैशात जास्त उत्पन्न मिळाले. यामुळे पालापाचोळय़ातून जमिनीला खत मिळून जमिनीचा पोतही सुधारत असल्याचा दावा उत्तम नायसे यांनी केला आहे. 
मलकापूर, ब:हाणपूर बाजारात मोठी मागणी खरबुजाच्या फळाला आहे, तसेच विदर्भातही मोठी मागणी असल्याचे शीतवर्धक, रसाळ, गोड खरबूज  प्रती फळ 15 रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. दरवर्षी आपण या शेतक:याचा माल विकत घेत असल्याचे फळ व्यापारी कय्यूम बागवान यांनी सांगितले.

Web Title: 3 lakhs yielded three lakhs of melon fruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.