पतीच्या निधनाचा मानसिक धक्का, पेटवून घेतल्याने १०० टक्के भाजली महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:54 PM2019-12-29T23:54:43+5:302019-12-29T23:55:23+5:30

पाळधी येथील घटना

3 percent burned woman due to mental shock of her husband's death | पतीच्या निधनाचा मानसिक धक्का, पेटवून घेतल्याने १०० टक्के भाजली महिला

पतीच्या निधनाचा मानसिक धक्का, पेटवून घेतल्याने १०० टक्के भाजली महिला

Next

जळगाव : पतीच्या निधनानंतर मानसिकदृष्या खचलेल्या आशाबाई संजय माळी (४०) महिलेने अंगावर पेट्रोल टाकून स्वत: ला जाळून घेतले. पाळधी, ता.धरणगाव येथे पहाटे पाच वाजता ही घटना घडली. आशाबाई या शंभर टक्के जळाल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशाबाई या पाळधी येथे धनगर वाड्यात वास्तव्याला आहेत.पतीचे तीन वर्षापूर्वी अकाली निधन झाले. त्यांना अमोल माळी (१९) व हा मुलगा तर ६ वर्षाची मुलगी आहे. पतीच्या अकाली निधनामुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता. त्या खासगी रूग्णालयात मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घरात मुलगा आणि मुलगी झोपत असतांना अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. पेट घेतल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर मुलगा अमोल झोपेतून जागा झाला आणि आई जळत असल्याचे पाहून त्याने अंगावर पाणी टाकून आग विझविली. खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान वैद्यकिय अधिकारी यांना तपासणी केली असता त्या १०० टक्के भाजल्या गेल्या आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
यापूर्वीही पाच दिवस होती गायब
आशाबाई यांनी शुक्रवारी २७ रोजी एका कॅनमध्ये ३०० रूपयांचे पेट्रोल घेतले होते असे त्यांनीच जखमी अवस्थेत सांगितले. यापूर्वी आशाबाई या कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. त्यावेळी नातेवाईकांना शोधाशोध केली होती. पाच दिवसानंतर परत घरी आल्या होत्या अशी माहिती मुलगा अमोल याने दिली.

Web Title: 3 percent burned woman due to mental shock of her husband's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव