कर्मचाऱ्यांच्या पगारात ५० टक्के कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:35 PM2019-12-10T12:35:33+5:302019-12-10T12:35:40+5:30
एस.टी.महामंडळाला फटका : उत्पन्न घटल्यामुळे महामंडळ तोट्यात
जळगाव : तोट्यात असलेल्या एस. टी. महामंडळाची दिवसेंदिवस आर्थिक परस्थिती बिकट होत असून, कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी देखील महामंडळाकडे पैसे नाहीत. त्यामुळे कर्मचाºयांच्या नोव्हेंबर महिन्याच्या पगारात ५० टक्के कपात करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे महामंडळाच्या फेºया कमी होऊन, याचा परिणाम दैनंदिन उत्पन्नावर झाला आहे. ज्या मार्गावर दररोजचे ५ लाखांचे उत्पन्न मिळते होते, त्या मार्गांवरील उत्पन्न सध्या निम्म्यावर आले आहे.
गेल्याच महिन्यांत डिझेलसाठी देखील वेळेवर पैशांचा भरणा न झाल्यामुळे, डिझेल टंचाईचे संकट निर्माण झाले होते. खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे परिणामी महामंडळ तोट्यात येत आहे.
त्यामुळे दर महिन्यात सात तारखेला होणारा पगार या महिन्यात लांबणीवर पडला आहे, त्यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे.
पगाराचे पैसे डिझेलसाठी खर्च
४सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे जिल्ह्यातील बहुतांश आगारांच्या उत्पन्नात घट झाली आहे. यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत येणारे उत्पन्नाची रक्कमही डिझेलसाठी राखीव ठेवण्यात येत आहे. कारण, डिझेल संपल्यावर आहे, ते उत्पन्नदेखील हातातून जाते. त्यामुळे या आठवडाभरातले उत्पन्न हे कर्मचाºयाच्या पगारासाठी न देता, डिझेल खरेदी केली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
पहिल्यादांच पगार लांबणीवर
४महामंडळाच्या कर्मचाºयांचा पगार हा महामंडळाच्या उत्पन्नातुनच होत असतो. यासाठी शासनातर्फे कुठलाही निधी येत नाही. पगारासाठी दर महिन्याला १ ते ६ तारखेपर्यंतचे दैनंदिन उत्पन्न हे फक्त पगारासाठीच ठेवले जाते. त्यानंतर ७ तारखेला पगार होतो. मात्र, यावेळेस पहिल्यादांच पगार लांबणीवर पडला असल्याचे महामंडळातील जुन्या कर्मचाºयांनी सांगितले.