राष्ट्रीय लोकअदालतीत ३ हजार ६०३ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:31 AM2020-12-13T04:31:51+5:302020-12-13T04:31:51+5:30

जळगाव - जिल्हा न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीने प्रलंबित प्रकरणे व खटलापूर्व असे ३ हजार ६०३ प्रकरणे निकाली ...

3 thousand 603 cases settled in National Lok Adalat | राष्ट्रीय लोकअदालतीत ३ हजार ६०३ प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीत ३ हजार ६०३ प्रकरणे निकाली

Next

जळगाव - जिल्हा न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीने प्रलंबित प्रकरणे व खटलापूर्व असे ३ हजार ६०३ प्रकरणे निकाली काढण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलाणी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव के.एच.ठोंबरे, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, सचिव दर्शन देशमुख तसेच वकील बांधव उपस्थित होते. यावेळी लोकअदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश आऱजे़ कटारिया, न्या़ एस़जी़ठुबे, न्या. जे.जी.पवार, न्या. अक्षी जैन, न्या. डी.बी.साठे यांनी कामकाज पाहिले. तर पॅनल सदस्य म्हणून अ‍ॅड. आर.टी.बाविस्कर, अ‍ॅड. मंजुळा मुंदडा, अ‍ॅड. विजय शिंदे, अ‍ॅड. कुसूम पाटील, अ‍ॅड़. संदीप पाटील, अ‍ॅड़ शेंलेंद्र पाटील, अ‍ॅड. वैशाली बोरसे, अ‍ॅड. तोषिक भिरूड, अ‍ॅड. शिल्पा रावेरकर, अ‍ॅड. श्रध्दा काबरा यांनी काम पाहिले. अ‍ॅड. संजयसिंग पाटील यांनी आयोजनास सहकार्य केले.

व्हॉटस्अ‍ॅप व्हीडिओ कॉलींगद्वारे घडवून आणली तडजोड

राष्ट्रीय लोकअदालतीमधील विशेष बाब म्हणजे, व्हॉट्सअ‍ॅप व्हीडिओ कॉलींगच्याद्वारे किरकोळ दिवाणी अर्ज चंद्रभान पाटील विरूध्द योगराज पाटील या प्रकरणामध्ये तडजोड घडवून आणली. यावेळी चंद्रभान पाटील यांचेशी पनवेल येथे त्यांचे वकील दर्शन देशमुख यांनी व्हॉट्सअ‍ॅप कॉलींगद्वारे पॅनल सदस्यांशी संवाद साधून दिला़ समोरील पक्षकार योगराप पाटील व त्यांचे वकील संग्राम चव्हाण हे हजर होते. यावेळी लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले ५४३ प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणांपैकी ३०६० प्रकरणी निघाली काढण्यात आले. एकूण हजार ६०३ प्रकरणे निकाली काढण्यात येवून १२ कोटी १ लाख ६७ हजार ३७४ रूपयांची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली.

Web Title: 3 thousand 603 cases settled in National Lok Adalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.