3 हजार विद्याथ्र्यानी दिली लिपीक टंकलेखकाची परीक्षा
By admin | Published: June 11, 2017 05:42 PM2017-06-11T17:42:03+5:302017-06-11T17:42:03+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी लिपीक टंकलेखक पदासाठी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा जिल्ह्यातील 3 हजार 161 विद्याथ्र्यानी दिली.
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.11 -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी लिपीक टंकलेखक पदासाठी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा जिल्ह्यातील 3 हजार 161 विद्याथ्र्यानी दिली. तर 503 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. परीक्षेसाठी जिल्ह्यातील 3 हजार 664 विद्याथ्र्यानी अर्ज केले होते. या परीक्षेसाठी शहरात एकूण 13 केंद्र तयार करण्यात आली होती. सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेदरम्यान परीक्षा घेण्यात आली.
स्टाफ सिलेक्शन कमीशनच्या परीक्षेदरम्यान अनेक विद्याथ्र्याना परीक्षा केंद्रावर वेळेवर न आल्याने बसू देण्यात आले नव्हते. त्यामुळे या परीक्षेदररम्यान असा प्रकार होवू नये म्हणून सर्वच विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर सकाळी 9.30 वाजेपासून हजर झाले होते. तसेच परीक्षेदरम्यान गैर प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक कें द्रावर ठराविक वेळेत भेटी देण्यात आल्या.