वैजापूर येथील ३ तरुण अपघातात ठार तर सात जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:33 PM2022-08-30T12:33:32+5:302022-08-30T12:36:55+5:30

वैजापूर ता.चोपडा येथील तरुणांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर चालकासह ७ जण जखमी झाले.

3 youths killed and 7 injured in an accident in Vaijapur | वैजापूर येथील ३ तरुण अपघातात ठार तर सात जखमी

वैजापूर येथील ३ तरुण अपघातात ठार तर सात जखमी

Next

चोपडा जि.जळगाव

वैजापूर ता.चोपडा येथील तरुणांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर चालकासह ७ जण जखमी झाले. ही घटना मध्य प्रदेश हद्दीत जामठी (जि.बडवाणी) गावाजवळ सोमवारी  रात्री ९ वाजता घडली.

आंबा अवतार (जि.बडवाणी) येथे कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी  वैजापूरहून १३ तरुण पिकअप वाहनाने निघाले होते.  वैजापूरहून अवघ्या ५ किलोमिटर अंतरावर जामठी गावाजवळ  एका वळणावर तरुणांचे वाहन तीन वेळा उलटले. 
यात  निलेश शांतीलाल बारेला, जगदीश केरसिंग बारेला हे  जागीच ठार झाले  तर पंकज प्रकाश बारेला यास जळगाव येथे नेत असतांना  रस्त्यातच  त्याचा मृत्यू झाला. राहुल संजय बारेला व  विवेक बारेला या जखमींना जळगाव तर परशुराम नाश्या बारेला, दिलीप बारेला, राहूल सरसर बारेला यांच्यासह पाच जणांना  चोपडा येथे खासगी रूग्णालयात दाखल  करण्यात आले आहे.

Web Title: 3 youths killed and 7 injured in an accident in Vaijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.