जळगावातील निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मुलीचा ३० लाखांसाठी छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 06:08 PM2018-06-23T18:08:27+5:302018-06-23T18:12:56+5:30

घर घेण्यासाठी माहेरुन ३० लाख रुपये आणावे यासाठी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी प्रतापसिंग राजपूत यांची मुलगी सोनाली किशोर राजपूत हिचा पती व सासरच्या लोकांना छळ केला व पैसे आणले नाहीत म्हणून अंगावरील दागिने काढून घेत घरातून हाकलून लावल्याचा प्रकार अयोध्या नगरात घडला आहे.

30-lack victim of Jalgaon retired Deputy Collector's daughter | जळगावातील निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मुलीचा ३० लाखांसाठी छळ

जळगावातील निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मुलीचा ३० लाखांसाठी छळ

googlenewsNext
ठळक मुद्देपतीसह सात जणांविरुध्द गुन्हामहिला सहाय्य कक्षाच्या शिफारशीनुसार गुन्हा दाखलअंगावरील दागिने काढून घरातून हाकलून लावले

जळगाव : घर घेण्यासाठी माहेरुन ३० लाख रुपये आणावे यासाठी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी प्रतापसिंग राजपूत यांची मुलगी सोनाली किशोर राजपूत हिचा पती व सासरच्या लोकांना छळ केला व पैसे आणले नाहीत म्हणून अंगावरील दागिने काढून घेत घरातून हाकलून लावल्याचा प्रकार अयोध्या नगरात घडला आहे. याप्रकरणी महिला सहाय्य कक्षाच्या शिफारशीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सोनाली यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १२ डिसेंबर २०१३ रोजी रितीरिवाजाप्रमाणे सोनाली यांचा किशोर गोविंदा राजपूत (रा.बालाजी पेठ, जळगाव) याच्याशी विवाह झाला. लग्नात आंधन म्हणून दोन लाखाचे सोन्याचे दागिने व दोन लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य दिले होते. लग्नानंतर चार महिने दोघांचा संसार सुरळीत चालला. त्यानंतर सासरच्या लोकांकडून त्रास सुरु झाल्याने पती-पत्नी सोनाली यांच्या वडीलांच्या मालकीच्या अयोध्या नगरातील घरात वास्तव्याला गेले. तेथे काही दिवस संसार सुरळीत चालल्यानंतर शेजारी राहणाºया नणंद सरला राजपूत व नंदोई कोमल राजपूत यांच्याकडून सतत टोचून बोलले जात होते. तेथेही त्रास झाला. याप्रकरणी पती किशोर गोविंदा पाटील, सासू सुनंदाबाई, सासरे गोविंदा रतन राजपूत, दीर विनोद (सर्व रा.बालाजी पेठ,जळगाव), कोमल राजपूत (नंदोई), सरला कोमल राजपूत (नणंद) व लक्ष्मण किसन राजपूत यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 30-lack victim of Jalgaon retired Deputy Collector's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.