जळगावात ३० पोलीस पाल्यांना जागेवरच मिळाली नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 06:21 PM2018-10-29T18:21:53+5:302018-10-29T18:23:50+5:30

जिल्हा पोलीस दल व अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात स्वयंरोजगार व रोजगार मेळावा घेण्यात आला. त्यात १४२ पोलीस पाल्यांनी सहभाग घेतला.

30 police officers got their place in Jalgaon | जळगावात ३० पोलीस पाल्यांना जागेवरच मिळाली नोकरी

जळगावात ३० पोलीस पाल्यांना जागेवरच मिळाली नोकरी

Next
ठळक मुद्देपोलीस मुख्यालयात झाला स्वयंरोजगार मेळावा७२ जणांना मिळणार नोव्हेंबर महिन्यात नोकरीआपले पोलीस अस्मिता या कार्यक्रमातंर्गत मेळावा

जळगाव : जिल्हा पोलीस दल व अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात स्वयंरोजगार व रोजगार मेळावा घेण्यात आला. त्यात १४२ पोलीस पाल्यांनी सहभाग घेतला. त्यातील ३० जणांना जागेवरच नोकरी देण्यात आली तर ७२ जणांना १२ नोव्हेंबरनंतर नोकरी दिली जाणार आहे.
आपले पोलीस अस्मिता या कार्यक्रमांतर्गत हा मेळावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अनुलोमचे जनसंपर्क अधिकारी भूपेंद्र मुजूमदार,अनुलोमचे उमवि प्रमुुख अमित डमाळे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. या मेळाव्यात महाराष्टÑ उद्योजकता विकास केंद्र, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, बळवंत नागरी सहकारी पतसंस्था, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, नीम आदींनी सहभाग घेतला. अनुलोमचे दत्ता नाईक, रुषीकेश करंजे, विलास लोहार, मधुकर पाटील, संजय कोळी, सागर रायगडे, विनोद देशपांडे आदी उपस्थित होते. उर्वरित तरुणांना १२ नोव्हेंबर नंतर औरंगाबाद, पुणे, नाशिक येथे सोईनुसार संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

Web Title: 30 police officers got their place in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.