जीएमसीत ३० विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:12 AM2021-07-09T04:12:47+5:302021-07-09T04:12:47+5:30
जळगाव : मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. ...
जळगाव : मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यात प्रशिक्षणासाठी निवड झालेले जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सहभागी झाले होते. उद्घाटनावेळी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, कौशल्य विकास अधिकारी एम. बी. देशपांडे उपस्थित होते.
तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासह रुग्णालयातील मनुष्यबळाचा प्रश्नदेखील सुटणार आहे. कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम शिकून स्वत:साठी व रुग्णसेवेसाठी स्वत:ला तयार करा, असे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. जीएमसीत जनरल ड्युटी असिस्टंट हा ३० विद्यार्थी प्रवेशक्षमता असलेला पहिला अभ्यासक्रम सुरू झाला आहे. कार्यक्रमावेळी रुग्णालयातील प्रशिक्षण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ. संजय बनसोडे, प्रशिक्षक तथा परिचर्या महाविद्यालयाचे प्राचार्य ए. व्ही. भालेराव, उपप्राचार्य व्ही. एच. भालेराव, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. श्रीकृष्ण चव्हाण, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. योगीता बावस्कर, डॉ. बाळासाहेब सुरोशे, दिलीप मोराणकर यांच्यासह कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण केंद्राचे जिल्हा समन्वयक महेश चौधरी, दत्तात्रय रिठे यांसह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.