शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत सहभागी होणार ३० हजार शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 04:41 PM2017-09-24T16:41:43+5:302017-09-24T16:42:51+5:30
शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करुन शासन नवनवीन आमिष दाखवून शेतकºयाची फसवणूक करीत आहे. दसरा, दिवाळी तोंडावर असताना आता चावडी वाचन करुन शासन वेळ वाया घालवत आहे. या सगळ्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी जळगावात मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव परिषद दुपारी १२ वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२४-शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करुन शासन नवनवीन आमिष दाखवून शेतकºयाची फसवणूक करीत आहे. दसरा, दिवाळी तोंडावर असताना आता चावडी वाचन करुन शासन वेळ वाया घालवत आहे. या सगळ्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी जळगावात मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव परिषद दुपारी १२ वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.
या परिषदेला राज्यभरातून सुमारे ३० हजार शेतकरी बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्या प्रतिभा श्ािंदे यांनी दिली.
यावेळी राज्य सुकाणू समितीचे सदस्य सचिन धांडे, जिल्हा सुकाणू समितीचे सदस्य मुकूंद सपकाळे, शंभू पाटील, दिलीप सपकाळे, पियूष पाटील उपस्थित होते.
प्रतिभा शिंदे म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यातील शेतकºयांचे प्रतिनिधी व राज्याचे जलपसंदा मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधात असताना कापसाला ७ हजार रुपये भाव मिळावा म्हणून बेमुदत उपोषण केले. मात्र त्यांच्याच सरकारकडून कापसाला ४ हजार १०० रुपये भाव दिला जात आहे. एकेकाळी शेतकºयांचे हित सांगणारे नेते आज हमीभाव व कर्जमुक्तीवर उत्तर द्यायला पुढे येत नाही, त्यामुळेच ही परिषद जळगावात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
आतापर्यंत ३०० सभा घेतल्या
शासनाच्या सर्व फसव्या योजनांचा पर्दाफाश शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी जिल्हाभरात आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक सभा घेण्यात आल्या आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात परिषदेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
शेतकरी नेत्यांचा सहभाग
परिषदेत राज्यभरातील विविध ४० शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व नेते सहभागी होणार आहेत. त्यात शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, खासदार राजू शेट्टी, डॉ.बाबा आढावा. आमदार बच्चू कडू, डॉ.अजित नवले, शेकापचे आमदार जयंत पाटील, महाराष्टÑ किसान सभा अध्यक्ष अशोक ढवळे, बळीराजा संघटनेचे संजय घाटणेकर आदी नेत्यांचा समावेश आहे.
शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, आयात-निर्यातबाबतीतील धोरण जे शेतकºयांच्या हिताचे असावे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, हमाल मापाडी, रिक्षा चालक युनियन, समविचारी संघटना, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, बुद्धीजीवी वर्ग या परिषदेत सहभागी होणार असल्याचेही प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.