चाळीसगाव तालुक्यातून ३०० कोटीची वाळू चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:09 AM2019-01-24T10:09:34+5:302019-01-24T10:10:15+5:30

मंत्रालयातून दखल

300 crore sand stolen from Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यातून ३०० कोटीची वाळू चोरी

चाळीसगाव तालुक्यातून ३०० कोटीची वाळू चोरी

Next
ठळक मुद्दे चौकशीचे आदेश



जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणेसीम येथे सुमारे ३०० कोटींची वाळू चोरी झाल्याचा आरोप झाल्याने व वाळूचोरांना मारहाण केल्याने गाजत असलेल्या या प्रकरणाचे पडसाद बुधवार, २३ रोजी मंत्रालय स्तरावरही उमटले. महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी प्रकरणाची व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. मात्र जिल्हाधिकाºयांनी असे आदेश आल्याचा ‘इन्कार’ केला आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी महसूलमंत्र्यांना पत्र देत ३०० कोटीची वाळू चोरी झाल्याचा आरोप केला आहे.
हिंगोणेसीम गावाला लागून असलेल्या तितूर नदी पात्रात गेल्या वर्षभरापासून १५ लाख घनफूट अवैधरित्या वाळूचा उपसा झाला आहे. ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे अनेकवेळा तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. २२ रोजी पहाटे चार वाजता सरपंच ज्ञानेश्वर महाजन व संतप्त ग्रामस्थांनी वाळूचा उपसा करणाºया जेसीबीने डंपर भरले जात असताना पकडले. जेसीबी हे माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी यांचे असून ते व डंपर चालक कोळी पळून गेले.
मुंडेंचे महसूलमंत्र्यांना पत्र
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना याप्रकरणी पत्र देऊन महसूल अधिकारी व पोलिसांच्या संगनमताने तितूर नदीतून ३०० कोटी रूपये किंमतीच्या १५ लाख घनफूट वाळूची चोरी झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

Web Title: 300 crore sand stolen from Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.