केळीचे 300 घड कापून फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 05:17 PM2017-10-23T17:17:59+5:302017-10-23T17:21:43+5:30
चोपडा तालुक्यातील चौगाव शिवारातील एका शेतक:याच्या केळी बागेतील कापणीवर आलेले केळीचे घड कापून फेकल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत ऑनलाईन चोपडा, दि.23 : तालुक्यातील चौगाव येथील काशिनाथ दौलत पाटील यांच्या शेतातील पक्व होऊन कापणीवर आलेले केळीचे 300 घड 22 ऑक्टोबरच्या रात्री 10 वाजेनंतर कुणीतरी अज्ञात इसमाने कापून फेकल्याची संतापजनक घटना घडली आहे. यात या शेतक:याचे जवळपास 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशीनाथ पाटील यांच्या चौगाव शिवारातील शेतामध्ये (गट नं 148 व 149 ) ‘श्रीमंती’ वाणाचे 8500 केळीच्या खोडांची लागवड केलेली आहे. ही केळी आता पक्व होऊन कापणीवर आली होती. तथापि रविवारी रात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने 250 ते 300 घड कापून फेकले. तसेच शेतातील पीव्हीसी पाईप, इलेक्ट्रिक स्टार्टरदेखील फोडून काढले आहे. यामुळे 70 ते 80 हजारांचे नुकसान झाले आहे. या बाबत काशिनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे. कॉ.काशिनाथ पाटील करीत आहेत.