नशिराबादला ३ हजार कुटुंब रेशन धान्यापासून वंचित...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:12 AM2021-07-24T04:12:26+5:302021-07-24T04:12:26+5:30
तहसीलदारांना निवेदन : ९ ऑगस्टला पदयात्रेचा इशारा नशिराबाद: येथील अनेक रेशन कार्डधारकांना धान्याची मिळत नसल्याने हाल होत आहेत, त्यातच ...
तहसीलदारांना निवेदन : ९ ऑगस्टला पदयात्रेचा इशारा
नशिराबाद: येथील अनेक रेशन कार्डधारकांना धान्याची मिळत नसल्याने हाल होत आहेत, त्यातच सुमारे २,५०० कुटुंब रेशन कार्ड मिळाले आहे. मात्र, बारा अंकी नंबर नसल्याने धान्य मिळत नाही, तर ५०० रेशन कार्डधारकांना १२ अंकी क्रमांक मिळाला असूनही, त्यांना कोणत्याच रेशन दुकानावर धान्य मिळत नाही. याबाबत प्रशासनाला अनेकदा समस्या निदर्शनास आणूनही दखल घेतली जात नसल्याने, अखेर येत्या पंधरवड्यात नशिराबाद येथील रेशन कार्डधारकांच्या समस्या न सुटल्यास, ९ ऑगस्ट रोजी नशिराबाद येथून तहसील कार्यालयापर्यंत पायी चालत येत दांडी मार्च आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन व पदाधिकारी यांनी दिला आहे.
याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष विनोद रंधे, शहराध्यक्ष नीलेश रोटे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते.