जिल्ह्यातील ३० हजार कोरोना योद्ध्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:17 AM2021-05-20T04:17:20+5:302021-05-20T04:17:20+5:30

- डमी - स्टार : ७१४ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. ...

30,000 Corona warriors in the district are waiting for the second dose | जिल्ह्यातील ३० हजार कोरोना योद्ध्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

जिल्ह्यातील ३० हजार कोरोना योद्ध्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

Next

- डमी

- स्टार : ७१४

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ३४ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. मात्र, कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या ३० हजार नागरिकांना अजूनही दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ३४ हजार ६३६ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला. दिवसेंदिवस बाधितांची संख्या तर वाढलीच, दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढले. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले, तसेच लसीकरणावरसुद्धा भर दिला. जिल्ह्यातील २० केद्रांवर लसीकरण केले जात आहे. या केंद्रांवर ४ हजार ८४० कोविशिल्ड लसीचा, तर २ हजार ३३० कोव्हॅक्सिन लसीचा शिल्लक साठा आहे.

३० हजार १६९ कोरोना योद्ध्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

जिल्ह्यात २५ हजार १९५ हेल्थ केअर वर्कर्सनी पहिला डोस घेतला आहे. त्यातील १५ हजार ५६० वर्कर्सनी दुसरा डोसही घेतला आहे, तसेच ३६ हजार ९१९ फ्रंट लाइन वर्कर यांनी पहिला डोस घेतला, तर त्यापैकी १६ हजार ३८५ वर्करांनी दुसरा डोसही पूर्ण केला आहे.

१ लाख ११ हजार नागरिकांनी घेतला दुसरा डोस

४५ वर्षांवरील व १८ ते ४४ वयोगटातील नागरिक अशांना लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत १ लाख ११ हजार १०२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. बुधवारी जिल्ह्यातील जळगाव व भुसावळात पहिला डोस, तर पारोळा येथील केंद्रावर दुसरा डोस देण्‍यात आला. यामध्ये जळगावात बुधवारी ४१, तर भुसावळात ६० नागरिकांना पहिला डोस देण्‍यात आला, तर पारोळ्यात ६५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला.

यांनाही लसीकरण...

तालुकानिहाय संख्या (पहिला डोस लाभार्थी)

अमळनेर (८२६१), भुसावळ (२९९४६), बोदवड (३३६९), भडगाव (४४७५), चाळीसगाव (७३६७), चोपडा (६२७२), धरणगाव (४४१४), एरंडोल (४२१०), जामनेर (७६७०), मुक्ताईनगर (४२४४), पाचोरा (७०६५), पारोळा (५३८२), रावेर (९०३३), यावल (८०२६), जळगाव (५४८३५), प्राथमिक आरोग्य केंद्र (११७९६३), उपकेंद्र (१३१०८), पीएमजेएवाय खासगी रुग्णालय (३९८९६).

आतापर्यंत दुसरा डोस लाभार्थी संख्या

अमळनेर (३८८६), भुसावळ (११४२७), बोदवड (१०८६), भडगाव (१४०५), चाळीसगाव (२९३९), चोपडा (१९६९), धरणगाव (१४४८), एरंडोल (१६१२), जामनेर (३५२६), मुक्ताईनगर (१७४७), पाचोरा (२६५०), पारोळा (२३३०), रावेर (२६२०), यावल (३३६५), जळगाव (१७९०३), प्राथमिक आरोग्य केंद्र (३७८३७), उपकेंद्र (३९७३), पीएमजेएवाय खासगी रुग्णालय (९३७९).

Web Title: 30,000 Corona warriors in the district are waiting for the second dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.