पोस्टामार्फत बाहेरगावी ३० हजार राख्या रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:39 PM2020-08-01T12:39:53+5:302020-08-01T12:40:15+5:30

जळगाव : बहिण भावाच्या नात्यातील वीण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या रक्षाबंधनांनिमित्त देशाची सेवा करणाऱ्या व विविध नोकरी, ...

30,000 Rakhs sent to the suburbs by post | पोस्टामार्फत बाहेरगावी ३० हजार राख्या रवाना

पोस्टामार्फत बाहेरगावी ३० हजार राख्या रवाना

Next

जळगाव : बहिण भावाच्या नात्यातील वीण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या रक्षाबंधनांनिमित्त देशाची सेवा करणाऱ्या व विविध नोकरी, व्यावसायानिमित्त बाहेरगावी राहणाºया भावांना बहिणींमार्फत यंदा ३० हजार राख्यांचे पाकीट देशाच्या विविध कानाकोपºयात पोस्टामार्फत पाठविण्यात आल्या आहेत. बाहेरगावाहून आलेल्या ३३ हजार राख्यांचे पाकीटे पोस्टामार्फत जिल्हभरात वाटप करण्यात आले असल्याची माहिती जळगाव डाक विभागातर्फे देण्यात आली.
दरवर्षी रक्षाबंधनाला बाहेरगावी राहणाºया भावांना भगिनींकडून पोस्टामार्फत राख्या पाठविण्यात येत असतात. त्यानुसार यंदाही जिल्हाभरातील पोस्टाच्या ४२ विभागीय कार्यालयांमधून शुक्रवारी सायंकाळपर्यंत विविध ठिकाणी ३० हजार राख्या बाहेरगावी पाठविण्यात आल्या. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह कुरिअर सेवाही बंद असल्यामुळे बहुतांश भगिनी पोस्टामार्फतचं राख्या पाठवित आहेत. गेल्या आठवडाभरात ३० हजार राख्या पाठविण्यात आल्या असून, यामध्ये आणखी वाढ होणार आहे. राख्या पाठविण्यासाठी पोस्टातर्फे आकर्षक पद्धतीचे स्वतंत्र पाकिट तयार करण्यात आले होते. राख्या वेळेत पोहचविण्यासाठी स्पीड पोस्टामार्फत या राख्या पाठविण्यात येत आहेत.

सुट्टीच्या दिवशींही राख्यांचे वाटप सुरू राहणार
३ आॅगस्ट रोजी रक्षाबंधन असून, डाक कार्यालयाला १ आॅगस्ट रोजी बकरी ईद व २ रोजी रविवारची सुट्टी आहे. मात्र, रक्षाबंधनामुळे टपाल वाटप कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. सुट्टीच्या दिवशीदेखील राख्यांचे वाटप सुरू राहणार असल्याची माहिती प्रभारी डाक अधिक्षक पु. बा. सेलूकर यांनी सांगितले.

३३ हजार राख्या वितरित
भगिनींच्यावतीने जिल्हाभरात ३३ हजार राख्या पोस्टाने आल्या असून, या सर्व राख्या पोस्टाच्या कर्मचाºयांतर्फे संबंधित भावांपर्यंत पोहचविण्यात आल्या आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रात राख्यांचे वाटप नाही
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे, त्या ठिकाणी शासनाच्या निर्देशानुसार राख्यांचे वाटप केले जाणार नाही. पाकिटावर दुरध्वनी क्रमांक असेल तर, संबंधितांना दुरध्वनीद्वारे पोस्टात बोलावून राख्यांचे पाकीट देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: 30,000 Rakhs sent to the suburbs by post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.