जळगाव जिल्ह्यात फक्त ३१ टक्के पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 11:21 PM2018-09-18T23:21:52+5:302018-09-18T23:22:23+5:30
शेतकरी वाऱ्यावर
जळगाव : खरीप पीककर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबर अखेर संपत असताना आतापर्यंत जिल्ह्यातील बँकांनी केवळ ३१ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. त्यामुळे शेतकºयांकडे बँकांनी पाठ फिरवल्याचे व शासन, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केली. त्यात अर्ज केलेल्या व पात्र शेतकºयांच्या यादीत नाव आलेल्या शेतकºयांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे खाते ‘निल’ झालेले नसल्याने ते बँकेच्या दृष्टीने थकबाकीदारच ठरले आहेत. त्यांना खरीप पीककर्ज देण्यास बँकांनी नकार दिला असल्याने त्यांना उधार उसनवाºया करून खरीप हंगामासाठी पैसा गोळा करावा लागला आहे. तर थकबाकीदार नसलेल्या शेतकºयांना देखील ५० टक्केच पीककर्ज देण्याचे धोरण जिल्हा बँकेने जाहीर केले आहे. त्यामुळे देखील शेतकºयांना पुरेशा प्रमाणात पीककर्ज मिळू शकलेले नाही.
२ लाख ९४ हजार ४०० खातेदारांपैकी १ लाख ६० हजार ७४७ खातेदारांना ९२० कोटी ५५ लाखांचे खरीप पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकेने १ लाख ३१ हजार ९३३ शेतकºयांना ४१९ कोटी ४१ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. म्हणजेच उद्दीष्टाच्या ५२ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. मात्र त्या तुलनेत राष्टÑीयकृत व खाजगी बँकांनी म्हणजेच व्यापारी बँकांनी शेतकºयांकडे पाठ फिरविली आहे. शासनाने वारंवार इशारा देऊनही या बँकांनी उद्दीष्टाच्या केवळ २४ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे.