बांद्रा एक्स्प्रेसमध्ये 31 हजारांची चोरी
By Admin | Published: May 16, 2017 01:54 PM2017-05-16T13:54:53+5:302017-05-16T13:54:53+5:30
झांशी ते भुसावळ प्रवास करीत असताना भोपाळ स्टेशन सोडल्यानंतर अज्ञात चोरटय़ाने गुलाबी रंगाची पर्स लांबवली़
ऑनलाईन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 16 - अप 15067 गोरखपूर-बांद्रा एक्सप्रेसमधून अज्ञात चोरटय़ाने 31 हजार 300 रुपये किंमतीची पर्स लांबवली़
आशिष पाटील (वय 34, रा. आनंद नगर, जामनेर) हे प}ीसह गोरखपूर-बांद्रा टर्मिनस एक्सप्रेसने झांशी ते भुसावळ प्रवास करीत असताना भोपाळ स्टेशन सोडल्यानंतर अज्ञात चोरटय़ाने गुलाबी रंगाची पर्स लांबवली़ त्यात 22 हजारांचे दोन मोबाईल, रोख दोन हजार 300 रुपये, पॅन कार्ड, आयडीबीआय बँकेचे एटीएम, मतदान, आधार कार्ड असा 31 हजार 300 रुपयांचा ऐवज होता़ भोपाळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा वर्ग झाला.
दुस:या घटनेत भुसावळ- अप पुरी अहमदाबाद एक्सप्रेस मधूनप्रवास करणा:या प्रवाशाची 10 हजारांची रोकड असलेली बॅग लांबवण्यात आली़ बोगी क्रमांक एस- 2 मधून प्रवास करणा:या सागर रवींद्रसिंह हजारी (वय 22, नाशिक) यांनी आपली बॅग डब्यातील स्वच्छताग्रृहाजवळ ठेवली असताना चोरटय़ांनी भुसावळ रेल्वे स्थानकाचे आऊटर येण्यापूर्वी लांबवली़
तिस:या घटनेत गाडी क्र.51187 कटनी पँसेंजरमध्ये चढत असताना तीन महिलांचे दागिने अज्ञात चोरटय़ाने लांबविले. स्मिता आकाश माहुरकर ( भुसावळ), मीना राजेंद्र सुतार, वैशाली दिनेश सोनवणे (दोघे रा.बरहाणपूर) या रेल्वेत चढत असताना चोरटय़ाने दागिने लांबवल़े महुरकर यांचे तीन ग्रॅमचे पेंडल, सुतार यांचे अडीच ग्रॅमचे मंगळसुत्र, सोनवणे यांचे दोन हजाराचे मंगळसूत्र लांबवण्यात आल़े वाढत्या चो:यांमुळे प्रवाशांमध्ये घबराट आह़े