वडील बरे झाल्याने जीएमसीला ३१ हजारांचा धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:18 AM2021-04-23T04:18:01+5:302021-04-23T04:18:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडचे संकट त्यात बेड उपलब्ध होत नसल्याची बिकट परिस्थिती असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रात्री ...

31,000 check to GMC after father recovers | वडील बरे झाल्याने जीएमसीला ३१ हजारांचा धनादेश

वडील बरे झाल्याने जीएमसीला ३१ हजारांचा धनादेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोविडचे संकट त्यात बेड उपलब्ध होत नसल्याची बिकट परिस्थिती असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रात्री २ वाजता रूग्णालयात दाखल करून घेतले आणि १२ दिवसांनी ते बरे होऊन सुखरूप घरीही परतले. वडिल बरे झाल्याच्या आनंदाने डॉक्टरांचे आभार मानत मुलांनी रुग्णालयाला ३१ हजारांचा धनादेश दिला. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी हा धनादेश स्वीकारला.

शहरातील कालंकामाता मंदिर परिसरातील ओंकार नगरातील रहिवासी राजेश शामराव चौधरी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना १० एप्रिल रोजी वेळेवर त्यांच्या मुलांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळेवर दाखल झाल्यावर व योग्य ते उपचार मिळाल्यामुळे राजेश चौधरी यांना बरे वाटू लागले. वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना २२ एप्रिल रोजी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. वडिलांना मिळालेल्या उपचारामुळे कृतज्ञता म्हणून त्यांची मुले लोकेश, गोपाल व मुलगी मेघा यांनी वैद्यकीय सेवेसाठी रुपये ३१ हजार रुपयांचा धनादेश गुरुवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सुपूर्द केला. याबद्दल अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विजय गायकवाड, अधिसेविका कविता नेतकर आदी उपस्थित होते.

Web Title: 31,000 check to GMC after father recovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.