एनएमएमएस परीक्षेला ३१५ विद्यार्थ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:17 AM2021-04-07T04:17:30+5:302021-04-07T04:17:30+5:30
जळगाव : केंद्र शासनाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. ...
जळगाव : केंद्र शासनाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मंगळवारी जिल्ह्यातील ९ केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेला १ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती, तर ३१५ विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती.
इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘एनएमएमएस’ परीक्षा घेतली जाते. ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांच्या आत आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. भारतातून एक लाख विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ परीक्षा उत्तीर्ण केल्यास शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्रातील १० टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती; परंतु आता त्यात वाढ करण्यात आली असून, वर्षाला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. जळगाव जिल्ह्यातून २०९७ विद्यार्थ्यांनी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मंगळवारी ९ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी संपूर्ण काळजी घेण्यात आली. २०९७ पैकी १७८२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर ३१५ विद्यार्थ्यांची परीक्षेला अनुपस्थिती होती.
अशी आहे केंद्रनिहाय उपस्थिती
जिल्ह्यातील केंद्र हजर संख्या
जी. एस. हायस्कूल (पाचोरा) १४४
ए. बी. गर्ल्स हायस्कूल (चाळीसगाव) २४८
श्री संत गाडगे महाराज स्कूल (भुसावळ) १३२
साने गुरुजी नूतन स्कूल (अमळनेर) १५०
ए. टी. झांबरे विद्यालय (जळगाव) २०४
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (जामनेर) ३०४
कुडे स्कूल (धरणगाव) १६०
के. नारखेडे (भुसावळ) १५९
प्रताप विद्यामंदिर (चोपडा) २८१
=========================================
गैरहजर संख्या
४२
२३
५१
१४
३६
२७
२५
३३
६४