३१६ पोलीस कर्मचा-यांना पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:16 AM2021-04-17T04:16:00+5:302021-04-17T04:16:00+5:30
जळगाव : जळगाव पोलीस दलातील तब्बल ३१६ पोलीस कर्मचा-यांना पदोन्नती मिळाली असून तसे आदेश शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे ...
जळगाव : जळगाव पोलीस दलातील तब्बल ३१६ पोलीस कर्मचा-यांना पदोन्नती मिळाली असून तसे आदेश शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी काढले आहे. मराठी नववर्षाच्या सुरूवातीलाच पोलीस अधीक्षकांनी याबाबतचे आदेश काढून पोलिसांना खुशखबर दिली आहे.
पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, पोलीस नाईक ते पोलीस हवालदार तसेच पोलीस शिपाई ते पोलीस नाईक याप्रमाणे पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातील ३१६ पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यात ९४ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस निरिक्षकपदी, १०० पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी तर १२२ पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्रतीबाबत पोलीस अधीक्षकांनी शुक्रवारी आदेश पारित केले आहे.
कमिटीत यांचा होता समावेश
सदर पदोन्नती कमिटीत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे, आस्थापना शाखेतील दीपक जाधव, सुनील निकम यांचा समावेश होता. दरम्यान, पोलीस दलाकडून पहिल्यांदाच पदोन्नतीची मोठे आदेश काढण्यात आले आहे.