साकेगावात ३२ हजाराचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 05:44 PM2020-08-02T17:44:06+5:302020-08-02T17:44:14+5:30
कारवाई : अनेक दुकानांवर होते विक्री
भुसावळ : शहराजवळील साकेगाव येथे मध्यप्रदेशसह भुसावळातील एका कॉलनीतून होलसेल भावात माल आणून गावामध्ये किराणा दुकानदारांना गुटखा विकणाऱ्याकडे तालुका पोलिसांनी छापा मारून ३२ हजाराचा गुटका जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी करण्यात आली. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये साकेगावात गुटखा व्यवसाय तेजीत होता. दहा रुपयाची पुडी २५ रुपयापर्यंत ब्लॅकमध्ये विकली जायची. अनेक दुकानदार आपल्या ग्राहकांना घरी बोलवून गुटख्याची सेवा देत होते. याबाबत तालुका पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना सुगावा लागताच त्यांनी साकेगाव येथील पिंटू भोई याच्याकडे छापा मारत ३२ हजाराचा गुटका मोटरसायकल सह जप्त केला.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस कर्मचारी विजय पोहेकर, संजय मोंढे, विठ्ठल फुसे, जगदीश भोई यांनी केली.
याशिवाय गावांमध्ये इंग्रजी दारूचीही आवैध विक्री होत असल्याचे चर्चा असून त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही कथित वाळू ठेकेदार यांनी गावठी दारू विक्री बंद व्हावी याकरता ग्रामपंचायत प्रशासनाला साकडे घालून दारूबंदीची मागणी केल्याची गावात चर्चा आहे.