328 कुटुंबांना मिळणार घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:02 PM2018-04-14T13:02:51+5:302018-04-14T13:02:51+5:30
झोपडपट्टीतील विस्थापीतांना दिलासा मिळणार
Next
ठळक मुद्देघरकुलांचे काम वर्षभरात होणार पूर्णशासनाचा 80 टक्के निधी
ज गाव : केंद्र व राज्य शासनाच्या एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन विकास योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको परिसरात 472 घरकुलांच्या योजनेला मंजूरी मिळाली होती. त्यापैकी 76 घरकुलांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. 252 घरकुलांचे काम याआधीच पूर्ण झाले असून, एकुण 328 लाभाथ्र्याना एप्रिल अखेर्पयत या घरकुलांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती अभियंता सोनगिरी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. शहरातील दांडेकर नगर झोपडपट्टीतील विस्थापीतांना या घरकुलांमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून या घरकुलांचे काम सुरु होते. अनेक वर्षापासून स्वत:च्या घराचे स्वपA पाहत असलेल्या लाभाथ्र्याना या घरांचे वाटप होणार आहे. 144 घरकुलांचे काम वर्षभरात होणार पूर्ण472 मंजूर घरकुलांपैकी 328 घरांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 144 लाभाथ्र्यांसाठी याच भागात पंतप्रधान आवास योजनेतून 156 घरकुले बांधण्याच्या प्रस्तावास शासनाने मंजूरी दिली आहे. तांत्रिक बाबींना मान्यता मिळाल्यानंतर या घरकुलांच्या कामांना देखील सुरुवात केली होणार आहे. सध्या घरकुलांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु असून, अंतीम मान्यता मिळाल्यानंतर आराखडा शासनाला पाठविण्यात येणार आहे. शासनाचा 80 टक्के निधी घरकुलांसाठी 10 कोटी 82 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात 80 टक्के निधी केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात आला. तर 10 टक्के मनपा व 10 टक्के निधी लाभाथ्र्याकडून घेण्यात आला. आकर्षक 9 इमारती तयार करण्यात आल्या असून, रंगरंगोटीचे काम सध्या सुरु आहे. किरकोळ रस्ते व गटारीचे काम अपूर्ण असून ते देखील आठ दिवसात पूर्ण केले जाणार असल्याची माहिती सोनगिरे यांनी दिली.