जळगाव मनपा निवडणुकीसाठी ३४ टक्के मतदान, पैसे वाटपाच्या प्रचंड तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 06:03 PM2018-08-01T18:03:52+5:302018-08-01T18:06:59+5:30

महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ३४ टक्के मतदान झाले.

34 percent polling for Jalgaon municipal elections, huge amount of money allocation | जळगाव मनपा निवडणुकीसाठी ३४ टक्के मतदान, पैसे वाटपाच्या प्रचंड तक्रारी

जळगाव मनपा निवडणुकीसाठी ३४ टक्के मतदान, पैसे वाटपाच्या प्रचंड तक्रारी

Next

जळगाव - महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ३४ टक्के मतदान झाले. मतदानासाठी मतदारांना उमेदवारांनी पैसे वाटपाच्या प्रचंड तक्रारी प्राप्त झाल्या. तर भुसावळ नगरपालिकेच्या बांधकाम समिती सभापतीच्या कारमध्ये पैसे आढळल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. दरम्यान, दुपारी ३.३० वाजेनंतर शहरातील अनेक केंद्रावंर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

बुधवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत  मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला.  दुपारी १.३० वाजेनंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढू लागली. दुपारी ३ वाजेपर्यंत ३४ टक्के मतदान झाले होते. मनपा प्रशासनाने केलेल्या मतदान जागृती अभियानानुसार यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता होती. मात्र, दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी पाहता गेल्या निवडणुकीइतकीच मतदानाची सरासरी राहण्याची शक्यता आहे.

आमदारांच्या भावाच्या कानशिलात लगावली 
प्रभाग १२ मधील भाजपाचे उमेदवार रवींद्र पाटील यांच्यासाठी स्टेट बॅँक कॉलनी परिसरात पैसे वाटप करताना भुसावळ नगरपालिकेचे बांधकाम सभापती अमोल इंगळे यांची चारचाकी गाडी शिवसेनेचे उमेदवार नितीन बरडे यांच्या कार्यकर्त्यांनी पकडली. त्यानंतर भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे ही गाडी घेवून जाण्यासाठी आले असता बरडे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रमोद सावकारे यांच्या कानशिलात लगावली. पोलिसांनी मध्यस्थी करुन हा वाद शांत केला. त्यानंतर पोलिसांनी ही गाडी जप्त केली.

सुरेशदादा जैन व गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला
९ पक्ष व अपक्ष असे एकूण ३०३ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. असे असले तरी खरा मुकाबला भाजपा व शिवसेना यांच्यात होत आहे. त्यासाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मनपावर सुरेशदादा यांची एकहाती सत्ता आहे. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने भाजपाने मनपात कमळ फुलविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी गिरीश महाजन जळगावात ठाण मांडून होते.

Web Title: 34 percent polling for Jalgaon municipal elections, huge amount of money allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.