३४ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा कट

By admin | Published: March 22, 2017 12:29 AM2017-03-22T00:29:14+5:302017-03-22T00:29:14+5:30

उन्हाळ्यात टंचाईच्या झळा : एक कोटी १४ लाखांची थकबाकी, वीज कंपनीची धडक कारवाई

34 power supply cut for Gram Panchayats | ३४ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा कट

३४ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा कट

Next


भुसावळ : ऐन उन्हाळ्यात भुसावळ तालुक्यातील तब्बल ३४ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा कट करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे़ मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर वीज कंपनीने धडक कारवाई सुरू केली असून अजून काही ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा लवकरच कट करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले़
दरम्यान, रणरणत्या उन्हाळ्याला प्रारंभ होताच ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन कट करण्यात आल्याने ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे तर दुसरीकडे काही ग्रामपंचायतींनी तातडीने थकबाकी भरल्याने त्यांचा वीजपुरवठा कट करण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले़
३४ ग्रा़पं़चा वीजपुरवठा कट
वीज वितरण कंपनीकडे तब्बल  एक कोटी १४ लाखांची थकबाकी वाढल्याने वीज वितरण कंपनीने सोमवारी व मंगळवारी भुसावळ तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्यावरील वीजपुरवठा खंडित केला़ वीजपुरवठा कट झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये भुसावळ तालुक्यातील सुनसगाव, गोजोरा, शिंदी, विचवे, मानमोडी, खंडाळा, मोंढाळा, सुरवाडे, बेलव्हाय, गोंभी, किन्ही, साकरी, वेल्हाळा, शिवपूर-कन्हाळा, कंडारी, मांडवेदिगर, मोहमांडली ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा कट करण्यात आला़
नोटिसांना केराची टोपली
वीज वितरण कंपनीतर्फे थकबाकीपोटी संबंधित ग्रामपंचायतींना १५ दिवसांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र नोटिसा बजावल्यानंतरही संबंधित ग्रामपंचायतींनी दखल घेतली नाही तसेच थकबाकी भरण्यासंदर्भात कुठलीही सकारात्मकता न दर्शवल्याने वीज कंपनीने संबंधित ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शन कट करण्याचे आदेश दिले़ भुसावळ तालुक्यासह बोदवड तालुक्यातील प्रत्येक सेक्शनचे आठ ते दहा कर्मचारी कारवाईत सहभागी झाले़ दरम्यान, वीज कनेक्शन कट झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत़
यांचा कारवाईत होता सहभाग
४अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्ही़डी़नवघरे, ए़आऱआलेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता अजय पाटील, सेक्शन इन्चार्ज डी़आरक़ोल्हे, किरंगे, एस़एल़पवार, सोनवणे, एस़आऱनिकम, शेख, यादव, दलाल यांच्यासह कर्मचाºयांनी कारवाईत सहभाग नोंदवला़
या ग्रामपंचायतींना दिलासा
थकबाकी लाखोंच्या घरात असली तरी तात्पुरती काही रक्कम भरल्याने काही ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शन कट झाले नाही. त्यात फेकरी ग्रामपंचायतीने एक लाख ८० हजार तर साकेगाव ग्रा़पं़ने दोन लाख व वांजोळा-मिरगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीने ५० लाख रुपये तसेच कुºहेपानाचे ग्रामपंचायतीने थकबाकी भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला नाही, असे सूत्रांनी सांगितले़

Web Title: 34 power supply cut for Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.