जळगाव जिल्ह्यातील मोठ्या जलसाठ्यांमध्ये ३५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:54+5:302021-06-28T04:12:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जुन महिना संपत आला तरी जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.३७ टक्के जलसाठा असून गिरणा ...

35% reserves in large reservoirs of Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील मोठ्या जलसाठ्यांमध्ये ३५ टक्के साठा

जळगाव जिल्ह्यातील मोठ्या जलसाठ्यांमध्ये ३५ टक्के साठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जुन महिना संपत आला तरी जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.३७ टक्के जलसाठा असून गिरणा धरण तर ३२.१७ टक्क्यांवर आले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून जोरदार पाऊस होत असल्याने गिरणा व वाघूर धरण १०० टक्के भरले गेले. त्यामुळे या दोन्ही मोठ्या प्रकल्पांपैकी वाघूर धरणात ६०.२९ टक्के जलसाठा आहे तर गिरणा धरणात ३२.१७ टक्के जलसाठा आहे. हतनूर धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने दररोज धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या या धरणात १७.६५ टक्के जलसाठा आहे. तीनही धरणात उपयुक्त साठा १२.८३ टीएमसी आहे.

यंदा सलग पाऊस होत नसल्याने धरण साठ्यांमध्ये फारसी वाढ होत नसल्याने सलग दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे.

Web Title: 35% reserves in large reservoirs of Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.